शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गोवारीटोला येथे आजाराची लागण

By admin | Updated: October 4, 2014 23:21 IST

प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी अंतर्गत येणाऱ्या गोवारी टोला येथे विविध रोगाची ग्रस्त पाच जणांचा मृत्यू झाला. महिनाभरात हे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

जांब (लोहारा) : प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी अंतर्गत येणाऱ्या गोवारी टोला येथे विविध रोगाची ग्रस्त पाच जणांचा मृत्यू झाला. महिनाभरात हे मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.पिटेसूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गोवारीटोला हे गाव आदिवासीबहुल भागात येत असुन परिसर जंगलानी व्यापलेला आहे. या ठिकाणी आरोग्याच्या सुविधांची अपुरी व्यवस्था आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरामध्ये विविध रोगांची लागण झाली आहे. या गावांमध्ये ८० ते १०० लोक आजही विविध आजारांने ग्रस्त असून ते खाटेवर असल्याचे आढळून येते. सप्टेंबर महिण्यामध्ये विविध आजाराने पाच व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रमेश देवराम राऊत (१७), श्रावण फागु शेंभरे (६०), कल्पना प्रेमलाल चौधरी (३५), अंकीता मोतीराम चौधरी (१४) तर सिकलसेल आजाराने आकाश अशोक भोंडे (२२) यांचा समावेश आहे. महिनाभरात विविध आजाराने पाच जणांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर समस्येकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागाकडून विविध सर्वे, तसेच डेंग्यु प्रतिबंधात्मक जनजागृती केल्याचे वैद्यकीय अधिकारी लुंगे हे सांगत आहे. तसेच ग्रामपंचायतकडून डास प्रतिबंधक फवारणी, धूर फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या परिसरामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव असून आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे. तरी आरोग्य विभागाने गोवारीटोला येथे त्वरीत आरोग्य शिबिराचे आयोजन करून नागरिकांवर औषधोपचार करण्याची मागणी सरपंच गुरुदेव भोंडे तसेच गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)