शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाला पुन्हा दहा वर्ष मुदत वाढ देण्यासाठी शासन प्रयत्नरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:01 IST

लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव (कोहळी) येथे आयोजित विविध विकासकामांचा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात विविध संघटनांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. नाना पटोले म्हणाले, वनजमीन, अतिक्रमित जमीन धारकांना त्यांच्या पट्ट्यासाठी लवकरच बैठक घेऊन सर्व प्रकरणांचा निपटारा करावयाचा आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : पिंपळगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आगामी विशेष अधिवेशनात आरक्षणात पुन्हा दहा वर्ष वाढ देण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. या आरक्षणाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक लाभ लोकसंख्येच्या प्रमाणात मिळण्यासाठी जनगणनेत ओबीसीचा उल्लेख व्हावा, असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव (कोहळी) येथे आयोजित विविध विकासकामांचा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात विविध संघटनांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.नाना पटोले म्हणाले, वनजमीन, अतिक्रमित जमीन धारकांना त्यांच्या पट्ट्यासाठी लवकरच बैठक घेऊन सर्व प्रकरणांचा निपटारा करावयाचा आहे. अनेक बेरोजगारांच्या हाताला काम द्यायचे आहे. धान खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी आहे. गावात सेवा सहकारी संस्था आहे. त्यांच्या माध्यमातून धान खरेदी करता येईल काय आणि त्याची तातडीने मोजणी करुन लवकरात लवकर चुकारे अदा करण्याचा प्रयत्न केला जाईल. बचत गटांना विविध उपक्रम देण्यात येतील. आपल्या गावाचा विकास कसा करता येईल. याविषयीच्या सुचना नवीन पिढीकडून अपेक्षित आहे. त्यातूनच आपली प्रगती होईल. गरीबी दूर करता येईल. पिक विम्याचे पैसे मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषद क्षेत्र पिंपळगाव अंतर्गत दहेगाव, पिंपळगाव, घाट किन्हाळ, चिचगाव, इंदोरा, सोनी आदी ठिकाणी १७ विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती मंगला बगमारे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, सरपंच शालु गहाणे, रामचंद्र परशुरामकर, तहसीलदार महल्ले, अभियंता मटाले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रशांत अवचटे, सुभाष खिलवाणी, राजू पालीवाल, प्रकाश देशमुख, लेकराम ठाकरे, गोपाल पारधी, शुध्दोधन मेश्राम, कटुजी अलोणे, योगेश सांगडे, उपसरपंच दादाजी पिल्लारे, सरपंच कल्पना खंडाते, उपसरपंच गोपाल परशुरामकर, टिकाराम मडावी यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेreservationआरक्षण