शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्दचा जलस्तर २४० मीटर होणार

By admin | Updated: September 30, 2014 23:32 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४० मिटर पर्र्यंत वाढविण्याचे निर्देश केंद्रीय जलआयोगाने दिल्याने उद्यापर्यंत २४० मिटर पर्यंत जलस्तर होणार आहे.

धरणाची ३३ वक्रद्वारे बंद : हजारो हेक्टर शेती पाण्याखालीगोसेबुज : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४० मिटर पर्र्यंत वाढविण्याचे निर्देश केंद्रीय जलआयोगाने दिल्याने उद्यापर्यंत २४० मिटर पर्यंत जलस्तर होणार आहे. काल रात्रीपासून धरणाचे सर्व ३३ वक्रद्वारे बंद करण्यात आले आहेत. आज धरणाचा जलस्तर ५ से.मी. ने वाढून ते २३९.९०० मिटर झाला आहे.२४० मिटरवर भंडारा जिल्ह्यातील पाथरी व सावरगाव सोडले तर कोणत्याही गावाला धोका नाही. पण नागपूर जिल्ह्यातील अनेक गावात धरणाचे पाणी शिरले आहे. भंडारा व नागपूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती धरणाच्या पाण्याखाली गेली आहे. पाथरी मध्ये एक एक घर गोसीखुर्द धरणाच्या पाण्यात बुडत आहेत. आतापर्यंत मोठ्या संख्येने घरे पाण्याखाली आले आहेत. जलस्तर वाढविण्याची वेळ, धानाच्या पिकाची वेळ, सणासुदीची वेळ व प्रकल्पग्रस्त गाव सोडण्याची वेळ एकाच वेळेस आल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना गाव रिकामे करण्याकरिता मोठ्या अडचणी येत आहेत. या गावातील ४३८ कुटुंब धरणाच्या पाण्याने बाधीत होणार आहेत. जुन्या गावात अजूनही ३० कुटुंब राहत आहेत. पाथरी व बुडीत क्षेत्रातील अनेक गावातील प्रकल्पग्रस्तांनी पुढे दसरा, दिवाळी व इतर सण असल्यामुळे धरणातील जलस्तर वाढविण्याला नवीन गावठाणात स्थानांतरण होईपर्यंत स्थगीती देण्याची मागणी केली होती. नवीन गावठाणात स्थानांतरण करून प्रकल्पग्रस्त सरकारला सहकार्य करीत आहेत. पण सरकार प्रकल्पग्रस्तांच्या समस्येकडे दुर्लक्ष करून धरणाचा जलस्तर वाढवित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत असंतोष पसरत आहे. धरणाचा जलस्तर २४०.२०० मीटर पर्यंत गेल्यास गावातील मुख्य रस्ता बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या जुन्या घरातील साहित्य काढण्याकरिता फार अडचणी येणार आहेत. सध्या प्रकल्पग्रस्त घरातील साहित्य काढण्या मात्र व्यस्त आहेत. सावरगावात चारही बाजूने पाणी झाले असून ईटगाव कडे जाणारा एकमात्र रस्ता सुरु आहे. सर्व प्रकल्पग्रस्तांनी गाव सोडले असून ३ कुटुंब त्यांची शेती गावाजवळ असल्यामुळे राहत आहेत. नागपूर जिल्ह्यातील जीवनापूर, खराडा, नवेगाव, सिर्सी, कोच्छी, पिपरी आदी गावात धरणाचे पाणी शिरले आहे. ज्या प्रकारे जलस्तर वाढविला जाईल त्या प्रामणे बुडीत क्षेत्रातील गावे रिकामे करण्याला गती येणार आहे. गावे रिकामी करण्याकरिता प्रकल्पग्रस्त सहकार्य करीत असल्यामुळे धरणातील जलस्तर वाढविण्याला मदत होत आहे. (वार्ताहर)