शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द प्रकल्प घालतोय पर्यटकांना भुरळ

By admin | Updated: July 28, 2014 23:22 IST

पर्यटन क्षेत्रात अतिशय झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे मोठ्या प्रमाणात उघडी आहे. वक्रद्वारातून वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा

धरणावर गर्दीच गर्दी : जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा गोसे (बुज.) : पर्यटन क्षेत्रात अतिशय झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाची सर्व ३३ वक्रद्वारे मोठ्या प्रमाणात उघडी आहे. वक्रद्वारातून वाहणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पाण्याचा खळ खळाट पाहण्याकरीता रोज पर्यटक मोठ्या संख्येत भेट देवून धरणाच्या सौंदर्याचा आठवणी आपल्या सोबत घेवून जात आहेत.गोसीखुर्द धरण या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असल्यामुळे या धरणाविषयी माहिती पुर्ण देशात पसरून हे स्थळ देशाच्या पर्यटनस्थळाच्या नकाशावर आले आहे. त्यामुळेच हे धरण विदर्भातील एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे.गोसीखुर्द धरणाच्या घाटउमरीच्या बाजुने असलेले घनदाट विस्तीर्ण जंगल, वनराईने नटलेल्या डोंगर दऱ्या, जवळूनच वाहणारे उजव्या कालव्यातील पाणी पाहून भेट देणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले जातात. सध्या वैनगंगा नदीला पुर येवून मोठा प्रवाह गोसीखुर्द धरणात येत असल्यामुळे धरणाची सर्व ३३ वक्रदारे घडतून पाण्याचा विसर्ग नदीपात्रत्तत केला जात आहे.या ३३ वक्रदारातून निघणाऱ्या धरणाच्या पाण्याचा प्रवाह खाली वैनगंगा नदीतून वाहत जातो. त्यातच उठणाऱ्या पाण्याच्या लाटा हे दृश्य पाण्याकरीता पर्यटकांची पाऊले गोसीखुर्द धरणाकडे वळत आहेत. गोसीखुर्द धरणाचे अप्रतीम सौंदर्य, धरणाच्या ३३ वक्रदारातून निघणारे पाणी, धरणात साठविलेले पाणी यामुळेच हे धरण पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत आहे.सध्या धरणाची सर्व वक्रदारे उघडल्यामुळे या धरणाचे सौंदर्य पाहण्याकरीता रोजच मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असून आपल्या सोबत धरणाच्या आठवणी घेवून जात आहेत. धरणाला लागूनच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे पवनी परिक्षेत्राचे जंगल आहे. या अभयारण्यासह गोसीखुर्द धरण मिळून हे एक चांगले पर्यटन स्थळाच्या रूपाने विकसीत होत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राच्या व्यवसायाची तालुक्यात मोठी वाढ होत आहे. (वार्ताहर)