शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दच्या ‘बॅक वॉटर’चा फटका

By admin | Updated: October 8, 2014 23:20 IST

गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजिवनी मिळाली असली तरी, प्रकल्पामुळे अनेक गावांतील हजारो नागरिकांना याची झळ पोहचली आहे. कारधा गावाला गोसेच्या बॅक वॉटरचा

कारधावासीयांमध्ये रोष : पुनर्वसनाची प्रक्रिया १५ वर्षांपासून रखडलीभंडारा : गोसेखुर्द प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजिवनी मिळाली असली तरी, प्रकल्पामुळे अनेक गावांतील हजारो नागरिकांना याची झळ पोहचली आहे. कारधा गावाला गोसेच्या बॅक वॉटरचा फटका बसत असल्याने अनेकांची घरे कोसळण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील १५ वर्षांपासून मार्गी लावला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.पूर्व विदर्भातील जिल्ह्यात 'हरितक्रांती' व्हावी, यासाठी महत्वकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनी ओलीताखाली आल्याने शेतकऱ्यांसमोरील ओलीताचा प्रश्न मिटला आहे. प्रकल्पामुळे शेतीला मुबलक पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी वरदान गोसेखुर्द प्रकल्प वरदान ठरले आहे. मात्र या प्रकल्पामुळे अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले असले तरी, अजुनही कारधा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरी आहे.सुमारे १५ वर्षांपासून कारधा गावाची पुनर्वसन प्रक्रिया रखडली असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा फटका कारधा गावाला बसत असल्याने पावसाळ्यात येथील नागरिक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. गावाचे पुनर्वसन करण्याच्या नावावर प्रशासन गावकऱ्यांना केवळ आश्वासन देत असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. प्रकल्पाचे पाणी गावात येत असल्याने अनेक घरांची पडझड झाली आहे. तर अनेक घर जिर्णावस्थेत आहेत. पाण्याच्या फटक्यामुळे अनेक घर पडण्याच्या स्थितीत असतानाही गावाचे पुनर्वसनही होत नाही व त्यांना नविन घर बांधण्यासही विरोध होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची 'इकडे आड, तिकडे विहिर' अशी परिस्थिती झाली आहे. तिनशेच्यावर घरांचा प्रश्न असल्याने प्रशासनाने गावाच्या पुनर्वसनाबाबत त्वरीत निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच शितला करंडी, अश्विन चौरे, शबाना खॉं पठाण, चंदा भुरे, कल्पना रेहपाडे व श्यामकला शिंदे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)