शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वनीकरणाच्या साहित्य खरेदीचे गौडबंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:52 IST

सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वृक्ष लागवड, रोप वाटीका, उद्यान तयार करणे मोकळया जागेवर वृक्षारोपन करण्याची कामे तुमसर तालुक्यात मोठा गाजावाजा करुन करण्यात आली.

ठळक मुद्देवृक्ष लागवड उपक्रमावर प्रश्नचिन्ह : काही औषधे, साहित्य स्वखर्चाने खरेदी केल्याची अधिकाºयांची कबुली

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सामाजिक वनीकरण विभागांतर्गत वृक्ष लागवड, रोप वाटीका, उद्यान तयार करणे मोकळया जागेवर वृक्षारोपन करण्याची कामे तुमसर तालुक्यात मोठा गाजावाजा करुन करण्यात आली. वृक्षलागवड व वृक्ष वाढीकरिता औषध व इतर साहित्य खरेदी करताना त्यांची निविदा न काढताच खरेदी करण्याचा प्रकार उघडकीस आला असून तीन दुकानदारांकडून बीले घेण्यात आली. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून खरेदी स्वखर्चाने केल्याची सारवासारव करणे सुरु आहे. शासनाने निधी उपलब्ध करुन दिला नाही अशी पुष्टीही अधिकाºयांने जोडली.तुमसर तालुक्यात वेगवेगळया वनपरिक्षेत्रात वृक्षलावगड करण्यात आली. शासनाकडून मंजूर ठराविक निधीचा उपयोग करुन वृक्षलागवड करण्यात आली. राज्य मार्गाच्या दुतर्फा विनासरंक्षणाने वृक्षलागवड करण्यात आली. ग्रामपंचायत हद्दीत रोपवाटीला तयार करण्याची कामे करण्यात आली. यात वृक्षलागवड करणे, रोपवाटीका तयार करणे, तयार रोपवाटीकेचे संगोपन करणे, संरक्षण करणे, लागवड झालेल्या वृक्षांचे सलग पाच वर्षे पर्यंत निधी राखून त्यांना वेळोवेळी मुबलक पाणीपुरवठा करण्याचा समावेध आहे.या कामांकरिता स्थानिक बेरोजगारांना मजूर म्हणून नेमण्यात आले. त्या मजूरांचे मानधन तथा विभागाच्या कर्मचाºयांचे वेतन मागील सहा महिन्यापासून झालेले नाही अशी माहिती आहे. वृक्ष लागवड झाली, रोपवाटीकेची कामे झाली, त्यांच्या संगोपनाकरिता किटकनाशक औषधी, फवारणीचे साहित्य, आवश्यक खतांची खरेदी मागील दोन महिन्यापासून झाली नाही. निधी शासनाने दिला नाही अशी माहिती संबंधित विभागाचे लागवड अधिकाºयानी दिली.तत्पूर्वी तुमसर शहर, खापा (तु) व पचारा येथून औषधे व साहित्य दुकानातून करण्यात आले तशी बीले घेण्यात आली. परंतु ती बीले नसून इस्टीमेट बोलविण्याची माहिती लागवड अधिकारी देत आहेत. स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करुन औषधे व साहित्य खरेदी केल्याची माहिती लागवड अधिकारी एफ.एम. राठोड यांनी दिली. वृक्ष संगोपन तथा संरक्षणाकरीता शासनातर्फे निधी मंजूर झाला नाही असे सांगितले.आवश्यक किटकनाशक औषधे, खते, साहित्य स्वखर्चावर तथा उधारी ठेवून खरेदी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती लागवड अधिकारी राठोड यांनी दिली. नोव्हेंबर महिन्यात १ कोटी ५० लक्ष वृक्ष लागवडीचे उदिष्ट शासनातर्फे राबविण्यात येणार आहे.तुमसर तालुक्यात पुढील वर्षी एक लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. वृक्ष लागवडीकरीता जमीन संबंधीत विभागाला मिळत नाही. हे वास्तव आहे. ग्रामपंचायती सहकार्य करीत नाही. हे विशेष. लाखोंचा निधी खर्च करुन वृक्ष लागवडीची कामे करण्यात आली. त्यांचे नियोजन न करता पुन्हा वृक्ष लागवड कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. साहित्यांची खरेदी, निविदेविना करणे, उधारी ठेवून शासनाच्या निधी येईपर्यंत वाट पाहणे ही शोकांतीकाच म्हणावी लागेल.सामाजिक वनीकरणात काम करणारे मजूरांची माहिती दरदिवशी भ्रमणध्वनीवर तहसील कार्यालयाला कळविण्यात येते. प्रत्यक्ष कामावर किती मजूर आहेत ते पाहण्याकरीता सबंधित विभागाचे कुणी जात नाही. कागदोपत्री तहसील कार्यालयाला माहिती का दिली जात नाही हा संशोधनाचा विषय आहे. रनेरा, मोहगाव ख, हरदोली, डोंगरला, तुमसर वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवडीच्या नावावर मोठा घोळ दिसत आहे. चौकशी अंती येथे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.वृक्ष लागवड तथा रोपवाटीकेकरिता उधारीवर दुकानातून साहित्य, औषधे घेण्यात आली. शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने खरेदी उधारीवर केली. दुकानदारांचे बील घेतले नसून ते इस्टीमेट सारखे आहे. काही खरेदी स्वखर्चाने केली.-एफ.एम.राठोड, लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण तुमसर.