शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास साधणार

By admin | Updated: February 22, 2016 01:04 IST

अती मागास गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राजकारणाच्या पलीकडे जावून कार्य करण्याची इच्छाशक्ती असल्याची ग्वाही खा. नाना पटोले यांनी दिली.

नाना पटोले यांची ग्वाही : सीतासांवगीत शेतकरी मेळावातुमसर : अती मागास गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राजकारणाच्या पलीकडे जावून कार्य करण्याची इच्छाशक्ती असल्याची ग्वाही खा. नाना पटोले यांनी दिली. सीतासांवगी येथे मॉयल फाऊंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेअंतर्गत बायफ- मित्रा संस्थेच्या सामूहिक विकास कार्याच्या महिला सशक्तीकरण व शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनापं्रसगी ते बोलत होते. यावेळी मॉयल लिमिटेडचे निर्देशक एम. पी. चौधरी, कार्यपाल निर्देशक दीपांकर सोम, कामगार संघटनचे जांभूळकर, तहसीलदार सोनवाने, शेखर कोतल्लीवार, जिल्हा परीषद सदस्या संगिता सोनवाने, संगिता मुंगुसमारे, शिशुपाल गौपाले, बाळकृष्ण गाढवे, तोफलाल रहांगडाले, उमा सेनकपाट, रमला कठौते, कविता बामचेर, दिलीप सोनवाने, ठाकचंद मुंगुसमारे आदी उपस्थित होते.खा. पटोले म्हणाले, तालुका अतिमागास असल्याने तालुक्यातील बघेडा (गर्रा) हे गाव दत्तक घेतला आहे. या गावाचा विकास करण्याकरिता वर्षभरात ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. ग्रामस्थांना रोजगारभिमुख बनविणे हा मानस बाळगला असल्याचेही सांगितले. त्याच बरोबर मॉयलने दत्तक घेतलेल्या ११ गावात सिएसआर निधीचा योग्य वापर करुन शेतकऱ्यांना सिंचन, आदी व्यवस्थाही निर्माण करुन मूलभुत गरजा पुर्ण होणार असल्याचे सांगितले. मॉयल निर्देशक एम.पी. चौधरी व दिपांकर सोम यांनी मॉयलच्या उत्तरदायीत्व सामाजिक योजनेच्या निधीचा मॉयल परिसरातील ११ गावातील नागरिकांचे आर्थिक स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीकोनातून संस्था बायफ कार्यरत आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, नविन तंत्रज्ञान व शैक्षणिक स्तर उंचविण्याकरिता योग्य परिश्रम घेत आहेत. ज्या समस्या येतील त्या सर्वांचे निराकरण मॉयल प्रशासनातर्फे करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक बायफ संस्थेचे उपाध्यक्ष डि.एन. शिंदे यांनी केले. संचालन अभिजित हडोले यांनी केले. आभार प्रदर्शन मॉयलचे उपप्रबंधक किशोर चंद्राकार यांनी मानले. कार्यक्रमाकरिता चिखला मॉयलचे व्यवस्थापक विकास परिदा व चमू तसेच बायफ- मित्रा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)