शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यातून व्यावहारिक, व्यापारी गुणांच्या विकासासाठी आनंद मेळावा

By admin | Updated: February 22, 2016 01:05 IST

विद्यार्थ्यांना दैनंदिन पुस्तकी ज्ञानाबरोबर व व्यापारी गुणांचे कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी आनंद मेळाव्यासारखे महत्वपूर्ण उपक्रम उपयोगी ठरतात.

सरिता चौरागडे यांचे प्रतिपादन : पालोरा शाळेत आनंद मेळावाकरडी (पालोरा) : विद्यार्थ्यांना दैनंदिन पुस्तकी ज्ञानाबरोबर व व्यापारी गुणांचे कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी आनंद मेळाव्यासारखे महत्वपूर्ण उपक्रम उपयोगी ठरतात. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी यातून कळतात. स्पर्धेच्या युगात सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नाही. अशावेळी त्यांच्यात असलेला व्यापारी गुण त्यांना स्वयंरोजगार मिळवून देवू शकतो, प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे यांनी केले. जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वतीने आयोजित आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाची दुकाने लावली. ग्राहक आकर्षित होण्यासाठी आकर्षक सजावट केली. भाजीपाला खाऊची दुकाने, हरभरा, गांजर, पाणी पाऊच, पापड, लोणचा, उसळ, भेल, पाणीपुरी, उपमा पोहा, चटणी भाकर, झुणका भाकर आदी अन्य दुकाने मोठ्या प्रमाणात लावली होती. आनंद मेळाव्यासाठी ग्राहक म्हणून गावातील प्रतिष्ठीत मंडळी व पालकांना निमंत्रीत करण्यात आले होते. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भरभरून आस्वाद घेतला. भाजीपाला व अन्य उपयोग साहित्य घरच्यासाठी विकतही घेतली. आठवडी बाजाराप्रमाणे विविध वस्तुंची खरेदी विक्री यामुळे विद्यार्थ्यांना धंदेवाईक कौशल्य आत्मसात करता आले. सोबतच फसवणूक कशी होते.ग्राहक मोलभाव करतात. उत्पन्न व खर्चाचा बजेट लावावा. वस्तुचे भाव बाजारनुसार करतेवेळी याचे प्रत्यक्ष अनुभव घेता आले. विद्यार्थ्यांच्या व्यावसायीक कौशल्याचे शिक्षक व पालकांनी भरभरून कौतुक केले. पुढीलवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेच्या वतीने करावे, अशी अपेक्षा पंचायत समिती सदस्य महादेव बुरडे यांनी व्यक्त केले. शाळेत प्राचार्य सेवकराम हटवार यांनी आनंद मेळाव्याचे महत्व समजावून सांगितले. मेळाव्याचे उद्घाटन जि.प. सदस्या सारिका चौरागडे यांचे हस्ते, पं.स. सदस्य महादेव बुरडे यांचे अध्यक्षतेखाली झाले. यावेळी अतिथी किरण भोयर, भोजराम तिजारे, युवराज गोमासे, रमेश ठक्कर, योगेश्वर चिंधालोरे, प्रकाश भोयर, प्राचार्य सेवकराम शेंडे, शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्ताविक प्राचार्य शेंडे यांनी केली. संचालन शिक्षक संजय वासनिक तर आभार शिक्षक के.पी. माने यांनी मानले. (वार्ताहर)