शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST

मोहाडी : येत्या २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घरकूल योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना ...

मोहाडी : येत्या २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घरकूल योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु मोहाडी तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या घरकुलाच्या ‘ड’ यादीचा ग्रामपंचायत ऑपरेटर व सचिवांनी सर्व्हे करते वेळी दुजाभाव करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून त्यांचे अर्ज ऑनलाइन केले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ‘ड’ यादीनुसार खऱ्या लाभार्थ्यांची नावे सुटल्याने घरकुलांच्या ‘ड’ यादीत मोठा घोळ झाला आहे. तरी तत्काळ दुरुस्ती करून ग्रामपंचायीच्या ठरावानुसार ‘ड’ यादीतील नाव सुटलेल्या लाभार्थीचे नाव ऑनलाइन करून गरजवंत लाभार्थींचा ‘ब’ यादीत समावेश करण्याची मागणी अखिल भारतीय ओबीसी संघाचे तालुका अध्यक्ष व माजी ग्रा.प. सदस्य नितीन लिल्हारे यांनी केली आहे.

मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द, पिंपळगाव, उसर्रा, आंधळगाव, बडेगाव, डोंगरगाव, काण्हळगाव, टांगा, ताडगाव, धोप, जांब, हिवरा, हरदोली, काटी, कान्द्री आदी गावांत नाव सुटलेल्या लाभार्थींबरोबर सरपंच यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सालई खुर्द येथील रामदास लिल्हारे, दिलीप मांढरे, कुशवलाल लिल्हारे, भगवान नागपुरे, शिवलाल मांढरे, प्रभू लिल्हारे, फिरतलाल सव्वालाखे, मनोज आंबाडारे, रवींद्र चचिरे, दुलीचंद उरकुडे, संकपाल ठाकरे, विठोबा मेश्राम, राजेंद्र मेश्राम, अर्जुन लिल्हारे, राजू अटराहे आदी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न मिळाल्याने हे लोक अजूनही कच्च्या घरातच वास्तव्यास आहेत.

ज्यांचे बीपीएल यादीत नाव असेल, अशा लाभार्थ्यांनाच पूर्वी घरकुलाचा लाभ मिळत असे. त्यामुळे पात्र असूनही अनेक लोकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता ज्यांचे कौलारू घर असेल, मातीचे, कुडाचे किंवा कच्च्या विटांचे असेल, अशा लाभार्थ्यांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्याचे प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व शबरी घरकूल योजना तयार केली आहे. परंतु, मोहाडी तालुक्‍यातील सालई खुर्द येथील शेकडो लाभार्थी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे घर मातीचे व कौलारू आहे. पावसाळ्यात जागोजागी गळत असल्याने घरावर झाकण्यासाठी पाल घ्यावे लागत असल्याने आर्थिक झळ सोसावी लागते.

अनेकांना पक्‍के घर असूनही घरकुलाचा लाभ मिळाला आहे. परंतु, पात्र असूनही काही नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आपल्या मोडक्‍या, कच्च्या घरातच दिवस कंठावे लागत आहेत.

खोट्यांना लाभ, खरे वंचित

सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना अनेक सवलती व विविध योजनांचे लाभ दिले आहेत. पण, काही जणांनी आर्थिकदृष्ट्या सधन असतानाही दारिद्र्यरेषेखालील अर्थात बीपीएल यादीत आपले नाव चढविले आहे. असे नागरिक घरकूल व इतर अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. अशा खोट्यांना लाभ मिळत असताना खरे गरीब नागरिक लाभापासून वंचित आहेत. जिल्हाभरात अशी अनेक प्रकरणे असून, याची व्यापक चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय ओबीसी संघाचे तालुका अध्यक्ष व मा. ग्रामपंचायत सदस्य नितीन लिल्हारे यांनी केली आहे.