शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

जीर्णावस्थेतील इमारतीत मुलींचे वसतीगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 00:25 IST

तुमसर तालुक्यातील आदिवासी मुलींना हायस्कुल ते पदव्युत्तर शिक्षण प्राप्त व्हावे याकरिता राज्याच्या आदिवासी विकास खात्याने तुमसर ...

तुमसरातील प्रकार : आदिवासी मुलींचे आयुष्य धोक्यातमोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील आदिवासी मुलींना हायस्कुल ते पदव्युत्तर शिक्षण प्राप्त व्हावे याकरिता राज्याच्या आदिवासी विकास खात्याने तुमसर शहरात शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सन २०१०२ मध्ये सुरु केले. सध्या हे वसतिगृह जिर्ण अतिशय धोकादायक आयुष्य संपलेल्या इमारतीत बजाज नगरात सुरु आहे. ७५ मुली येथे जीव मुठीत घालून राहत आहेत. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी या वसतिगृहाला भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली होती हे विशेष.राज्य शासनाने सन २००२ मध्ये तुमसरात आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह सुरु केले. या वसतिगृहात ७५ मुली वर्ग ८ ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या राहतात. बजाज नगरात हे वसतिगृह सुरु आहे. ही इमारत शासनाने भाड्याने घेतली आहे. जीर्ण अतिशय धोकादायक आयुष्य संपलेल्या इमारतीत हे वसतिगृह सुरु आहे. वसतिगृहासमोर मोठमोठी झाडे आहेत. समोर पाणी साचले असून इमारतीच्या वरच्या माळ्यावर काही खोल्यात पाणी गळणे सुरु आहे. याकरिता प्लास्टीक लावण्यात आले आहे.प्रत्येक खोल्यात कुंदट उग्रवास येतो. इमारतीच्या भिंतीचे सिमेंट प्लास्टर निघाले आहे. इमारत कोसळण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही. मुलींच्या वसतिगृहाकरिता ही इमारत शासनाने कशी काय निवडली हा मुख्य प्रश्न आहे. सध्या या इमारतीचे भाडे २४ हजार प्रती महिना आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने भाडेआकारणी केली आहे. मुलांचे वसतिगृह भंडारा रोड येथे भाड्याने आहे. तिथे ११० मुले राहतात.तुमसर येथे शासकीय आयटीआय समोर मुलामुलींचे नवीन वसतिगृहाचे बांधकाम मागील तीन वर्षापासून कासवगतीने सुरु आहे. सन २०१२-२०१३ मध्ये त्याला मंजुरी मिळून बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मुलामुलींचे स्वतंत्र वसतिगृह इमारतीकरिता १ कोटी ७० लाख (एका इमारती) करिता मंजुर करण्यात आले. वेळेत वसतिगृह तयार न झाल्याने किंमत वाढली. शासनाने येथे मुलांच्या वसतिगृहाकरिता ४ कोटी २७ लक्ष व मुलींच्या वसतिगृहाकरिता ४ कोटी २७ लक्ष निधी मंजूर केला. सध्या कामे प्रगतिपथावर सुरु आहे. शासन व प्रशासनाने लक्ष वेधून घेण्याकरिता आठ दिवसांपूर्वी आदिवासी संघटनेने धरणे आंदोलन सुरु केले होते. संघटनेचे पदाधिकारी माजी जि.प. सदस्य अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, दिनेश धुर्वे यांनी आदिवासी मंत्री विष्णू सावरा यांची मुंबईत भेट घेवून समस्या मांडली.