शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावरून गाजली जिल्हा परिषदेची सभा

By admin | Updated: March 24, 2016 01:17 IST

जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी एक छदामही

भंडारा : जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट असताना जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी एक छदामही राखून ठेवली नाही. यावर विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला. अखेरीस पाणीपुरवठा विभागासाठी १ कोटी २० लाख रुपयांची सुधारीत तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन सभागृहात देण्यात आले.सोमवारी जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा पाण्याच्या विषयासह विविध मुद्दयांवर गाजली. ही सभा रात्री ९ वाजतापर्यत सुरू होती. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात पाणीपुरवठा विभागासाठी विशेष निधीची तरतूद केली जाते. पाणीपुरवठा योजना, कर्मचाऱ्यांचा पगार व भविष्य निर्वाह निधीसाठी ही तरतूद असते. परंतु, या अर्थसंकल्पात एकही तरतूद करण्यात आली नाही. याशिवाय शहापूर, गोबरवाही आदी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेली पाणीपट्टी कर एक हजार २०० रुपयांवरून थेट एक हजार ८०० रुपये करण्यात आल्याने विरोधी सदस्यांनी आक्षेप घेत ही करवाढ मागे घेण्याची मागणी केली. या करवाढीचा भुर्दंड नळधारकांना बसणार असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत हातपंपाची दुरुस्ती, प्रादेशिक नळ योजनेतील वीज पंपाची देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी निधीची तरतूद असताना यावेळी निधीच देण्यात आला नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)अर्थसंकल्पात त्रुट्या४सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक त्रुट्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर्षी सुमारे पाच कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून त्यात ग्रामीण जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाणीपट्टी कर वाढविण्याची काहीच गरज नसताना ती ६०० रुपयांनी वाढविण्यात आली. भाजपचे सदस्य संदीप ताले, अरविंद भालाधरे, सुभाष आजबले यांनी या अर्थसंकल्पावर आक्षेप घेतला आहे.