शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

हा खेळ ऊन्ह-सावल्यांचा

By admin | Updated: September 27, 2014 01:10 IST

२५ वर्षांची युती तुटली आणि १५ वर्षांची आघाडीही बिघडली. पदाधिकारी सैरभैर झाले.

भंडारा : २५ वर्षांची युती तुटली आणि १५ वर्षांची आघाडीही बिघडली. पदाधिकारी सैरभैर झाले. काल एका पक्षातला आज दुसऱ्या पक्षात दिसत आहे. भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत काडीमोड झाल्यामुळे उमेदवारांची जमवाजमव सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी काँग्रेसने तुमसर व साकोलीत उमेदवारी जाहीर केली. परंतु, भंडाऱ्यात अद्याप नाव घोषित केलेले नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने अद्याप एकाही मतदारसंघातील नावे घोषित केलेली नाही. शिवसेनेने भंडारा, तुमसर येथे उमेदवारी घोषित केली असली तरी साकोलीत सेनेचा उमेदवार घोषित केलेला नाही. त्यातच कालपर्यंत भाजपावासी असलेले आज राष्ट्रवादीमध्ये तर काही शिवसेनेत गेले आहेत. उद्या शनिवारला उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे, तरीही उमेदवार घोषित झालेला नाही, शेवटच्या दिवशी उमेदवार घोषित होण्याची, ही बहुधा पहिली वेळ असावी.तुमसर विधानसभाभंडारा : तुमसर विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे तर युतीच्या जागा वाटपात भाजपकडे होता. विद्यमान आमदार अनिल बावनकर यांची उमेदवारी कापून काँग्रेसने प्रमोद तितीरमारे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज असलेले बावनकर हे उद्या शनिवारला अपक्ष नामांकन दाखल करण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे युती आणि आघाडीत काडीमोड झाल्यामुळे तीनदा आमदार राहिलेले भाजपचे मधुकर कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. परंतु सायंकाळपर्यंत त्यांचा प्रवेश झालेला नव्हता. किसान गर्जना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य चरण वाघमारे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरु आहे. परंतु त्यांच्या नावाची सायंकाळपर्यंत घोषणा झालेली नव्हती. मनसेने विजय शहारे यांना तर बसपाने नामदेव ठाकरे यांना रिंगणात उतरविले आहे. भंडारा विधानसभाभंडारा : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेला भंडारा विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे होता. ही जागा शिवसेनेने जिंकली होती. आज शुक्रवारला सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर, बसपाच्या देवांगणा विजय गाढवे, मनसेचे मनोहर खरोले यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे. आघाडी बिघडल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे. परंतु यापैकी एकाही काँग्रेसने सायंकाळपर्यंत उमेदवार घोषित केला नव्हता. भाजपकडून रामकुमार गजभिये यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु त्यांचेही नाव घोषित झालेले नव्हते. काँग्रेसकडून प्रेमसागर गणवीर यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेश डोंगरे, सच्चिदानंद फुलेकर, सुमेध श्यामकुवर यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. युवाशक्ती संघटनेकडून शशिकांत भोयर यांचे नाव चर्चेत असून याठिकाणी लढत रोमांचक होणार आहे.साकोली विधानसभाभंडारा : साकोली विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे तर युतीच्या जागा वाटपात भाजपकडे होता. याठिकाणी भाजपचे नाना पटोले विजयी झाले होते. आता ते लोकसभेत पोहोचले असून भाजपने अद्याप उमेदवारी घोषित केलेली नाही. काँग्रेसने माजी आमदार सेवक वाघाये यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून बाळा काशीवार यांचे नाव चर्चेत आहे. शुक्रवारला सायंकाळी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिलेले डॉ. प्रशांत पडोळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या मतदारसंघात बसपा आणि मनसेचे उमेदवार अद्याप घोषित झालेले नाहीत. या मतदारसंघात कुणबी समजाचे प्राबल्य असले तरी ते विविध प्रवर्गात विखुरले आहेत. त्यामुळे एका समाजातून किती उमेदवार रिंगणात राहतात. आणि कोणत्या प्रवर्गाला मतदार जवळ करतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.