शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोमेजलेले चेहरे आणि धीरगंभीर वातावरण

By admin | Updated: October 19, 2014 23:16 IST

लोकसभेपाठोपाठ राज्यातही परिवर्तनाच्या लाटेतून भंडारा, तुमसर, साकोली विधानसभा क्षेत्रही सुटले नाही. कोमेजलेल्या चेहऱ्यामधून कमळ फुलले अन् जल्लोषाचा वातावरण बरेच काही सांगून गेला.

भंडारा : लोकसभेपाठोपाठ राज्यातही परिवर्तनाच्या लाटेतून भंडारा, तुमसर, साकोली विधानसभा क्षेत्रही सुटले नाही. कोमेजलेल्या चेहऱ्यामधून कमळ फुलले अन् जल्लोषाचा वातावरण बरेच काही सांगून गेला. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेली मतमोजणी दुपारपर्यंत सुरूच होती. या कालावधीत पराभूत उमेदवारांच्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते. कोमेजलेल्या नेत्रबिंदूत धिरगंभीर वातावरण निर्माण होत होते. आता पुढे काय होणार याची शाश्वती चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती. तिन्ही क्षेत्रातील मतमोजणी सुरू असलेल्या स्ट्राँगरुम परिसरात कुणाला किती मते मिळाली याची चुणुकही लागताच धास्तावलेले चेहरे आकडेवारीच्या आवाजाकडे लक्ष देत होते. सर्वाधिक धीरगंभीर चेहरे भंडारा क्षेत्रात पहावयास मिळाले. शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. अनेक कार्यकर्त्यांनी अश्रुला वाट मोकळी करुन दिली होती.प्रत्येक फेरीत हृदयाचे ठोके वाढत असताना मिळत असलेली उमेदवाराला मते बाहेरील वातावरण तापवत होती. सुरुवातीच्या सात फेऱ्यांनंतर वातावरण धिरगंभीर होऊ लागले. दहाव्या फेरीत मात्र चेहऱ्यावरील संयम तुटला. आशेची किरण मावळताना दिसली. दुपारपर्यंत स्ट्राँगरुम परिसरातील प्रतिनिधी हळूहळू बाहेर निघत होते. विजयी उमेदवाराचा जल्लोष साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांची मार्गावर गर्दी जमत होती. घोषणाबााजीमुळे बाहेरील वातावरण विजयाचे तर कोमेजलेल्या चेहऱ्यांना बघून वातावरण तणावाचे होते.भाजपचे उमेदवार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, राजेश काशीवार हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. विजयाची घोषणा होण्यापुर्वीच भंडारा, तुमसर, साकोलीत विजयी मिरवणुक काढण्यात आली. विजयांच्या घोषणाने आसमंत दणाणून गेले. दुसरीकडे पराभूत गटातील सदस्यांच्या चेहऱ्यावरचा ताण आणि चिंता स्पष्ट दिसत होती. दुरदर्शनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात भाजपची लाट दिसत असताना जिल्ह्यातही तशीच स्थिती राहणार काय? या विवंचनेत पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत होते. दुपारनंतर मात्र रस्त्यावर फक्त विजयी उमेदवारांची गर्दी दिसत होती. नारेबाजीत मोदींचे नाव प्राधान्याने घेतले जात होते. सांयकाळी निवडणुक अधिकाऱ्यांकडून भाजपचे उमेदवार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, राजेश काशिवार यांनी जेव्हा विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारले तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. भाजपच्या एकहाती विजयानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि बसपा या पक्षांवर पराभव होण्याची कारणे शोधण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात ‘भाजपमध्ये उत्साहच उत्साह तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षात निरुत्साह दिसून आला. (नगर प्रतिनिधी)