आरएसएसद्वारा नि:शुल्क ऑक्सिजन बँकेची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:39+5:302021-06-09T04:43:39+5:30

गुजरात येथील सीतांजली फाउंडेशनच्या सहकार्याने चालणाऱ्या युएसए सिटीजन ऑफ इंडिया, बीएपीएस स्वामीनारायण संस्था (नागपूर), ...

Free Oxygen Bank launched by RSS | आरएसएसद्वारा नि:शुल्क ऑक्सिजन बँकेची सुरुवात

आरएसएसद्वारा नि:शुल्क ऑक्सिजन बँकेची सुरुवात

गुजरात येथील सीतांजली फाउंडेशनच्या सहकार्याने चालणाऱ्या युएसए सिटीजन ऑफ इंडिया, बीएपीएस स्वामीनारायण संस्था (नागपूर), आमदार विनोद अग्रवाल व चेतन जसानीद्वारा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात देण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजता संघाच्या कार्यालयात आयोजित ऑक्सिजन मशीन वितरण कार्यक्रमाला यूएसए सिटीजन ऑफ इंडिया तथा बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३, गोंदिया तालुक्यातील २ व तिरोडा येथील १ कोविड रुग्णाच्या कुटुंबीयांना मशीन देण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक लीलाराम बोपचे, विभाग कार्यवाह उमेश मेंढे, नगर कार्यवाह बालकृष्ण बिसेन, दलजितसिंग खालसा, अजय यादव, मधू शेंडे, कोमल धोटे, प्रभाकर राव, तुषार घडोले, जयवंत डोये, कमल छिपेकर, प्रवीण पटले उपस्थित होते. येत्या आठवड्यात आणखी काही मशीन संघ कार्यालयात उपलब्ध होणार आहे.

Web Title: Free Oxygen Bank launched by RSS