शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती विटंबनाप्रकरणी चौघांना अटक

By admin | Updated: June 15, 2016 00:44 IST

देव्हाडी येथील नेहरु वॉर्डात पुरातन हनुमान मंदिर आहे. सोमवारी सायंकाळी अज्ञात समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करून तोडफोड केली.

तुमसर : देव्हाडी येथील नेहरु वॉर्डात पुरातन हनुमान मंदिर आहे. सोमवारी सायंकाळी अज्ञात समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करून तोडफोड केली. याविरोधात स्थानिकांनी तुमसर - गोंदिया राज्य महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेहरु वॉर्डातील हनुमान मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याची माहिती स्थानिक नागरिक सायंकाळी पूजेकरिता गेले असता हा प्रकार लक्षात आला. क्षणात शेकडोंचा जमाव मंदिराबाहेर गोळा झाला. स्थानिक पोलिसांनी तुमसर ठाण्यात माहिती दिल्यावर ठाणेदार जगदीश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश हावरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव ताफ्यासह मंदिरात पोहोचले. संतप्त जमावाने रात्री ८ वाजता तुमसर - गोंदिया महामार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध नोंदविला. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी स्थानिकांनी केली. राज्य महामार्गावर तणावाची स्थिती होती. पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मंदिर तथा परिसराची पाहणी केली. रात्री मंदिरात पोलीस तैनात करण्यात आले होते. स्थानिक युवक व पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी रात्री मंदिर सील केले. पोलिसांनी स्थानिकांशी चर्चा केली. मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी येथे करण्यात आली आहे. ठसे तज्ज्ञांना येथे पाचारण करण्याची मागणीही मंदिर समितीने केली. एक महिना हे मंदिर बंद राहणार असून १४ जुलै रोजी नवीन हनुमंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीने ‘लोकमत’ला दिली. मंदिराबाहेर मादक साहित्य आढळून आले. अवैध दारू व गांजा ओढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)मूर्ती विटंबनाप्र्रकरणी संशयित चार जणांना अटक करण्यात आली आहे. एका आरोपीचा शोध सुरु आहे. या प्रकरणात दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.-जगदीश गायकवाडपोलीस निरीक्षक, तुमसर