आधारभूत धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक काट्यांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:31+5:30

यंदाच्या खरिपात शासनाने  लाखांदूर तालुक्यात जवळपास १४ आधारभूत धान खरेदी केंद्र मंजुर केले आहेत. सदर केंद्र लाखांदूर येथील विजय लक्ष्मी राईस मिल सहकारी संस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था व मासळ येथील पंचशील भात गिरणी अंतर्गत सुरु करण्यात आले आहेत. गत काळात आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी शासनाने धान खरेदी प्रक्रियेत अनेक बदल केले आहेत.

Forget the electronic thorns at the basic grain shopping center | आधारभूत धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक काट्यांचा विसर

आधारभूत धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक काट्यांचा विसर

googlenewsNext
ठळक मुद्देनांदेड येथील प्रकार : साध्या काट्याने धानाचे मोजमाप, शासन आदेशाची पायमल्ली

  लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शासनाने आधारभूत केंद्रांतर्गत धानाची खरेदी करतांना इलेक्ट्रॉनिक काट्याने मोजमाप करणे बंधनकारक केले आहे. मात्र लाखांदूर तालुक्यात सदर शासन आदेशाची पायमल्ली करीत बहुतांश केंद्रावर इलेक्ट्रॉनिक काट्याऐवजी साध्या काट्याने धानाचे सदोष मोजमाप केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदाच्या खरिपात शासनाने  लाखांदूर तालुक्यात जवळपास १४ आधारभूत धान खरेदी केंद्र मंजुर केले आहेत. सदर केंद्र लाखांदूर येथील विजय लक्ष्मी राईस मिल सहकारी संस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था व मासळ येथील पंचशील भात गिरणी अंतर्गत सुरु करण्यात आले आहेत. गत काळात आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी शासनाने धान खरेदी प्रक्रियेत अनेक बदल केले आहेत.
शेतकऱ्यांकडून शासनाची दिशाभूल टाळण्यासाठी डिजिटल सातबारा यासह धानाचे मोजमाप करतांना इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर बंधनकारक केले आहे. त्यानुसार तालुक्यातील काही केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर केला जात असतांनाच बहुतांश केंद्रावर साध्या काट्यानेच धानाचे मोजमाप केले जात असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.
     सदर मोजमाप सदोष केले जात असून प्रती पोती चार ते पाच किलो अधिक वजनाने मोजमाप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान सदर गैरप्रकार तालुक्यातील नांदेड येथे उघडकीस आला आहे. गैरप्रकारावर आळा घालण्याची  मागणी पिडीत शेतकऱ्यांनी केली आहे.
 

Web Title: Forget the electronic thorns at the basic grain shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.