सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पाच पंपगृह सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 05:00 AM2020-01-02T05:00:00+5:302020-01-02T05:00:13+5:30

बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.

Five pump houses of Sondayatola irrigation project started | सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पाच पंपगृह सुरू

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पाच पंपगृह सुरू

Next
ठळक मुद्देजलाशय तुडूंब : अवकाळीचा शेतीला फटका, मात्र सिंचन प्रकल्पाच्या साठ्यात वाढ

रंजीत चिंचखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांसाठी नुकसानीचा ठरत असला तरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पासाठी संजीवनी ठरत आहे. नव्या वर्षात १ जानेवारीपासून पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. सदर जलाशय तुडूंब भरल्याने परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.
१ जानेवारीपासून प्रकल्प स्थळातील पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. अवकाळी पावसाने हा जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. जलाशय तुडूंब भरत असताना प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. या परिसरात पर्यटकांना वाहन प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत असले तरी जलपातळीत वाढ झाल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. शेतकरी पाण्यासाठी प्रतीक्षा करताना दिसत आहे.

जलसाठ्याचे नियोजन गरजेचे
उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चित्र राहत असल्याने जलाशयातील पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे असले तरी अवकाळी पावसाने प्रकल्पाला नवसंजीवनी दिली आहे. बावनथडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गत दोन महिने नदीपात्रात पाणी होते, परंतु विजेचे ब्रेकडाऊन असल्याने पंपगृह सुरु करण्यात आले नव्हते. १ जानेवारीपासून प्रकल्पस्थळात पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. ३६ फुट पाणी साठवण करण्याची क्षमता असणाºया चांदपूर जलाशयात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असण्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनानेही अलर्ट जारी केला आहे.

Web Title: Five pump houses of Sondayatola irrigation project started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.