रोजगार हमी योजनेचा पाच कोटींचा निधी थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:51+5:30

गत चार वर्षांपासून तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाच कोटींचा निधी मिळाला नाही. ग्रामपंचायतींना साहित्य उधारीवर देण्यात येत नाही. ग्रामपंचायतींनी कामे कशी करावी असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पडला आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली.

Five crore funds of the Employment Guarantee Scheme | रोजगार हमी योजनेचा पाच कोटींचा निधी थकीत

रोजगार हमी योजनेचा पाच कोटींचा निधी थकीत

Next
ठळक मुद्देविकासकामे प्रभावित : विधानसभा अध्यक्षांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यात रोजगार हमी अंतर्गत कुशल कामांचे पाच कोटींचा निधी थकीत आहे. मागील चार वर्षापासून निधी मिळाला नाही. परिणामी विकास कामांना खीळ बसली आहे. निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. संपूर्ण तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
गावाच्या विकास कामात रोजगार हमी योजनेची कामे मैलाचा दगड ठरली आहे.
गत चार वर्षांपासून तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाच कोटींचा निधी मिळाला नाही. ग्रामपंचायतींना साहित्य उधारीवर देण्यात येत नाही. ग्रामपंचायतींनी कामे कशी करावी असा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना पडला आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्यात दोन लाखावरील कर्ज व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करावी, अशी मागणी आहे.

तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करा
तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. तत्पूर्वी पावसाच्या हंगागात अल्पवृष्टी झाली. त्यामुळे हातची पिके गेली. शासनाने सर्व्हे करून संपूर्ण तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांना केली.

Web Title: Five crore funds of the Employment Guarantee Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.