शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

प्रजनन काळात मासेमारीवर बंदी

By admin | Updated: July 29, 2014 23:38 IST

माशांच्या प्रजनन काळात मासेमारीवर बंद आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन असल्याची माहिती आहे. विदर्भातील मासेमार बहुतांश गरीब आहेत. यावर पर्यायी तोडगा काढण्यासंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न सुरु

प्रस्ताव विचाराधीन : वर्षभर मुबलक मासे मिळावे याकरिता प्रयत्नमोहन भोयर - तुमसरमाशांच्या प्रजनन काळात मासेमारीवर बंद आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन असल्याची माहिती आहे. विदर्भातील मासेमार बहुतांश गरीब आहेत. यावर पर्यायी तोडगा काढण्यासंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे सुत्राने सांगितले. जुलै ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत माशांचा प्रजननकाळ सुरु असतो. भरपूर मासे खवय्यांना मिळावे व मासेमारांना मोठ्या प्रमाणात वर्षभर रोजगार प्राप्त व्हावा याकरिता माशांच्या प्रजननकाळात मासेमारीवर सरसकट बंदी आणण्याचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन आहे. मुंबई, कोकणासह समुद्र किनाऱ्यावर प्रजननकाळात मासेमारी बंद असते. देशाच्या इतर काही राज्यात माशांच्या प्रजननकाळात मासेमारीवर बंदी आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी तिथे सुरु होते. प्रजननकाळात मासेमारी केल्याने कोट्यवधी मासे जन्मापूर्वीच मृत्यूमुखी पडतात.सध्या मादी माशांच्या पोटात लक्षावधी अंडी आहेत. मासे जन्माला येण्यापूर्वीच त्यांची हत्या होते. ही बंदी आणली तर पुढील काळात वर्षभर भरपूर प्रमाणात मासे उपलब्ध होतील. यामुळे मासेमारांचे अच्छे दिन येतील असा तर्क शासनस्तरावर सुरु आहे.पूर्व विदर्भ व पश्चिम गोड्या पाण्यात बाराही महिने मासेमारी सुरु असते. येथील मासेमार पोटाची खळगी भरण्याकरिता मासेमारी करतात ही बंदी आणली तर त्याचे कोणते परिणाम होतील. यावर सशक्त पर्यायी तोडगा कोणता असेल यावर शासनस्तरावर खलबते सुरु आहेत. मासेमारी संस्था येथे हजारोंच्या संख्येत आहेत. परंतु असंघटीत मासेमारांची संख्या येथे मोठी आहे. शिक्षणाच्या अभावामुळे ते पारंपारिक व्यवसाय करीत आहेत. खऱ्या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे.तोडग्याशिवाय बंदी नाहीमाशांच्या प्रजननकाळात बंदी आणली तर विदर्भातील मासेमारांवर उपासमारीची पाळी येईल. दोन महिन्यांच्या कालावधीत शासनाने सशक्त पर्यायी तोडगा काढण्याची गरज आहे. प्रजनन काळात समुद्रकिनारपट्टीत मासेमारी केली जात नाही. देशाच्या इतर काही राज्यात त्यावर बंदी आहे. परंतु तेथील स्थानिक स्थिती, मासेमारांची आर्थिक स्थिती व विदर्भातील मासेमारांची स्थिती यात मोठी तफावत आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय मत्स्य महामंडळाचे संचालक संजय केवट यांनी दिली.