शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा तालुक्यात पहिल्यांदाच पाॅझिटिव्ह रुग्ण शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नाेंद भंडारा तालुक्यात करण्यात आली आहे. त्यातही भंडारा शहरात सर्वाधिक रुग्ण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आढळून येत हाेते. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ३४८ जणांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी एकट्या भंडारा तालुक्यात २४ हजार ७०६ रुग्णांची नाेंद करण्यात आली. त्यापैकी २४ हजार १७६ रुग्ण बरे झाले असून, ४९२ जणांचा काेराेनाने बळी घेतला. २७ एप्रिल २०२० राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण भंडारा तालुक्यातच आढळला हाेता.

ठळक मुद्देजिल्ह्यात १३ पाॅझिटिव्ह : ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही नियंत्रणात, आराेग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाला दिलासा

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात काेराेना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळला तेव्हापासून दरराेज भंडारा तालुक्यातील पाॅझिटिव्ह रुग्णांची नाेंद हाेत हाेती. दुसऱ्या लाटेत तर १७ एप्रिल राेजी सर्वाधिक ६१४ पाॅझिटिव्ह रुग्णांची नाेंद झाली हाेती. आता रुग्णसंख्या वेगाने कमी हाेत असून,  शुक्रवार भंडारा तालुक्यासाठी दिलासा देणारा ठरला. पहिल्यांदाच पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य आली. दुसरीकडे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. यामुळे प्रशासन आणि आराेग्य यंत्रणेवरील माेठा ताण कमी झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नाेंद भंडारा तालुक्यात करण्यात आली आहे. त्यातही भंडारा शहरात सर्वाधिक रुग्ण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आढळून येत हाेते. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ३४८ जणांना काेराेनाची बाधा झाली. त्यापैकी एकट्या भंडारा तालुक्यात २४ हजार ७०६ रुग्णांची नाेंद करण्यात आली. त्यापैकी २४ हजार १७६ रुग्ण बरे झाले असून, ४९२ जणांचा काेराेनाने बळी घेतला. २७ एप्रिल २०२० राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण भंडारा तालुक्यातच आढळला हाेता. तेव्हापासून दरराेज भंडारा तालुक्यात काेराेना रुग्णांची नाेंद हाेत हाेती. एप्रिल महिन्यात तर भंडारा तालुक्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला हाेता. १७ एप्रिल राेजी जिल्ह्यात १२४० आणि त्यात भंडारा तालुक्यात ६१४ रुग्ण नाेंदविण्यात आले हाेते. भंडारा तालुक्यातील ग्रामीण भागापेक्षा भंडारा शहरात रुग्णांची संख्या अधिक हाेती. जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णही भंडारा तालुक्यातच दिसत हाेते. मात्र शुक्रवार तालुक्यासाठी दिलासा देणारा ठरला. जिल्ह्यात ९९९ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. यासाेबतच तुमसर, पवनी तालुक्यातही काेराेना संख्या निरंक आहे. तर साकाेली तालुक्यात सात, लाखनी दोन, लाखांदूर तीन आणि माेहाडी तालुक्यात एक रुग्ण आढळून आला. 

चार लाखांवर व्यक्तींची काेराेना चाचणी- जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ८ हजार ९८६ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली आहे. त्यात ५९ हजार ३४८ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी ५८ हजार १६६ व्यक्तींनी काेराेनावर मात केली तर, १०५५ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.१० टक्के- जिल्ह्यात एप्रिल महिन्यात रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ६५ टक्क्यापर्यंत कमी झाले हाेते. परंतु जून महिन्यात रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९८.१० टक्के झाले आहे. जिल्ह्यात सध्या ०.२१ टक्के सक्रिय रुग्ण असून, मृत्यूदर १.७८ टक्के आहे. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट १.३ टक्के आहे. एप्रिल महिन्यातील काेराेना उद्रेक अनुभवल्यानंतर रुग्णसंख्या कमी हाेत असल्याने माेठा दिलासा मिळत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या