भंडारा - मोहाडी तालुक्यातील पांढराबोडी येथील एका घरालाआग लागून संपूर्ण घराची राख रांगोळी झाल्याची घटना पहाटे ३ वाजताच्या सुमासास घडली. आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. घरातील रोख रक्कमही जळाली.
पांढराबोडी येथील रवी यादव मंगळवार ६ एप्रिल रोजी रात्री कुटुंब झोपी गेले होते. पहाटे ३ वाजताच्या सुमारास घरी बांधलेली शेळी जोराने ओरडायला लागली. त्या आवाजाने रवी जागे झाले. पाहतात तर काय घराला आग लागल्याचे दिसले. आरडाओरड केल्याने गावकारी जागे झाले. आग विझविण्याचा प्रयत्न सुरु झाला. मात्र तो पर्यंत आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. आगीत सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. घरात एका डब्ब्यात असलेली रोख रक्कमही आगीत भस्मसात झाली.