शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बचत गटांसाठी विक्री केंद्र मंजूर

By admin | Updated: June 13, 2016 02:14 IST

स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत तालुकास्तरावरील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र तयार करण्यात येणार आहे.

बसस्थानकाजवळ होणार बांधकाम : दोन वर्षानंतर सुटला जागेचा तिढा मोहाडी : स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेअंतर्गत तालुकास्तरावरील स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र तयार करण्यात येणार आहे. बसस्थानक मोहाडी समोरील खाली जागेत लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे.स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून वस्तू उत्पादीत केली जाते. उत्पादीत केलेली वस्तू ठराविक ठिकाणावरून विक्री व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून तालुकास्तरावर कायम स्वरुपी विक्री केंद्र बांधण्याची योजना आहे. मोहाडी येथे स्वयंसहायता बचत गटासाठी विक्री केंद्र बांधण्यासाठी जागेच्या मंजुरीसाठी दोन वर्षाहून अधिक प्रतिक्षा करावी लागली. जिल्हाधिकारी भंडारा, वनविभाग भंडारा, तहसीलदार मोहाडी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभाग पंचायत समितीकडून खंडविकास अधिकारी मोहाडी गजानन लांजेवार व विस्तार अधिकारी शामलाल भोयर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे वनविभाग भंडाराकडून वडेगाव / मोहाडी येथील गटक्रमांक ८६ आराजी २.९३ हे.आर. जागेपैकी ५१२.५४ चौरस मिटर क्षेत्र असलेली जागा मंजूर करण्यात आली आहे. आता बचत गटाच्या उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी कायमस्वरुपी विक्री केंद्र बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आाहे. विक्री केंद्र बांधकामासाठी ५० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शासन निर्णयात नमूद केलेल्या टाईप प्लॅन प्रमाणे विक्री केंद्राचे बांधकाम केले जाणार आहे. बसस्थानकाच्या बाजूला विक्री केंद्र बनणार असल्याने समोरील अतिक्रमण केलेली दुकाने बाजूला केली जाण्याची शक्यता आहे. महिलांनी उत्पादित केलेला माल विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे बचत गटांमध्ये वस्तू उत्पादीत करण्याची स्पर्धा निर्माण होणार आहे. या विक्री केंद्रामुळे बसस्थानकाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. (तालुका प्रतिनिधी)