शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाची अंतिम मान्यता अधांतरी

By admin | Updated: July 14, 2014 23:46 IST

तालुक्यातील शेतीसाठी सिंचनाची पर्यायी व्यवस्था म्हणून भिमकलसा प्रकल्पाकडे शेतकरी मागील ३५ ते ४० वर्षापासून वाट पाहत आहेत. मात्र राजकीय चढाओढ व शासनाची कासवगती यात या

भिमलकसा प्रकल्प : वनमंत्रालयाकडून अंतिम मान्यता नाही
संजय साठवणे - साकोली
तालुक्यातील शेतीसाठी सिंचनाची पर्यायी व्यवस्था म्हणून भिमकलसा प्रकल्पाकडे शेतकरी मागील ३५ ते ४० वर्षापासून वाट पाहत आहेत. मात्र राजकीय चढाओढ व शासनाची कासवगती यात या प्रकल्पाचे ग्रहण अजूनपर्यंत सुटले नाही. विदर्भ पाटबंधारे महामंडळाच्या मध्यम प्रकल्प उपविभागाने भीमलकसा सिंचन प्रकल्पासाठी वन पर्यावरण विभागाला १४.५ कोटी रूपये भरले. परंतु वन व पर्यावरण विभागाकडून प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे १० टक्के काम पूर्ण झाले नाही.
भिमलकसा प्रकल्पाला ८ मे १९७३ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या प्रकल्पाचे काम जोनवारी १९७५ रोजी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आले. या प्रकल्पाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित १० टक्के काम वनकायद्यामुळे रखडले आहे. भिमलकसा प्रकल्पाचे क्षेत्र डोंगराळ भागाजवळ व वनक्षेत्राला असून अविकसीत व सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसलेले क्षेत्र आहे. या भागातील शेती नैसर्गिक पाण्यावर अवलंबून आहे.
भीमलकसा या सिंचन प्रकल्पासाठी वनविभागाच्या ११६.०३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहन करण्यात आले. या जागेचा मोबदला व खांबा वडेगाव येथील पर्यायी जागा वनविभागाला देण्यात आली. त्यावर वनीकरण करण्यात येणार आहे. वनीकरणासाठी साडेचौदा कोटी रूपये आणि दंडात्मक कारवाई म्हणून ४६ लाख रूपये सिंचन विभागाकडून वन विभागाने वसूल केले. तरीही वन विभागाकडून भिमलकसा प्रकल्पाला अद्याप अंतिम मान्यता मिळाली नाही.
या प्रकल्पासाठी शासनाने मागील ३५-४० वर्षापासून सतत कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. १९९० च्या सुमारास या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. उर्वरित १० टक्के काम तसेच रखडले आहे. २००८ ला माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी या प्रकल्पाची वनकायद्यातून सुटका केली. तेव्हा हा प्रकल्प लवकरच पुर्णत्वास जाईल, अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र लोकाचा अपेक्षाभंग झाल्या. या प्रकल्पासून २ हजार ७०० एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
तीन महिन्यापूर्वी जलाशयाची पाळ डावा व उजवा कालवा, झळभरणी या कामासाठी पाटबंधारे विभागाने निविदा सुद्धा मागविल्या होत्या. मात्र आचारसंहितेमुळे त्या तशाच पडून राहिल्या. या तलावाची पाळ यापूर्वीच वाहून गेली. त्यात शेतकऱ्यांची वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील व गावातील शेतकरी पाळीवर माती टाकत असतात.
या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आल्यावर जमनापूर, पाथरी, वडेगाव, खांबा व तुडमापूरी या गावातील शेतीला सिंचनाची सोय होणार आहे. शासनाने प्राधान्याने या प्रकल्पाकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे व परिसरात हरित क्रांती घडवून आणावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे.