जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:53 IST2021-02-23T04:53:09+5:302021-02-23T04:53:09+5:30

भंडारा : येथील जिल्हा कारागृहात दोन न्यायाधीन बंदींमध्ये हाणामारी झाल्याची घटना शनिवारी जिल्हा कारागृहात घडली. या प्रकरणी ...

Fighting among inmates at the district jail | जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

भंडारा : येथील जिल्हा कारागृहात दोन न्यायाधीन बंदींमध्ये हाणामारी झाल्याची घटना शनिवारी जिल्हा कारागृहात घडली. या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शनिवारी न्यायाधीन बंदी कार्तिक बकाराम मेश्राम रा. केसलवाडा हा कारागृहातील बॅरेक क्र . ७ समोरील पटांगणावर येऊन किरण शिवशंकर समरीत या बंदीसोबत भांडण करीत होता. कार्तिकने किरणला उचलून जमिनीवर आपटले. त्याला मारहाण करीत असताना, चंद्रशेखर घरत यांनी दोघांमधील भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्तिकने चंद्रशेखरसोबत धक्काबुक्की केली. त्यानंतर, दोन्ही बंदींना तुरुंग अधिकारी श्रेणी १ यांच्याकडे नेले असता, तिथे तुरुंग अधिकाऱ्यांसमोरच दोन्ही बंदींची हाणामारी सुरू झाली. त्यावेळी चंद्रशेखर घरत यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता, कार्तिक मेश्रामने चंद्रशेखर यांचे कॉलर पकडून शिवीगाळ केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने जमिनीवर पडलेला मोठा दगड उचलून चंद्रशेखर यांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे असलेल्या पोलिसांनी तो दगड हिसकावून घेतला.

या प्रकरणी चंद्रशेखर घरत यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी कार्तिक मेश्राम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Fighting among inmates at the district jail