शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सायकलपटू सुशिकलाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार

By admin | Updated: February 26, 2017 00:28 IST

दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप सायकलींग स्पर्धेत सुशिकला आगाशे या मोहाडी तालुक्यातील निलज करडी येथील खेळाडूने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.

जिल्ह्याची पहिली खेळाडू ठरली अजिंक्य : आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याला मिळवून दिला लौकिकभंडारा : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन चॅम्पियनशिप सायकलींग स्पर्धेत सुशिकला आगाशे या मोहाडी तालुक्यातील निलज करडी येथील खेळाडूने भारताला रौप्य पदक मिळवून दिले. या अलौकिक कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.याप्रंसगी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले उपस्थित होत्या. याप्रसंगी तिचे वडील दुर्गाप्रसाद आगाशे यांचाही सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा नैपुण्य चाचण्यामध्ये पात्र ठरणाऱ्या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे क्रीडा प्रबोधिनीमध्ये सुशिकला आगाशेची सन २०११-१२ मध्ये राज्यस्तरावर निवड करण्यात आली. क्रीडा प्रबोधिनी नागपूर येथे तिला सरावासाठी प्रवेश देण्यात आला. सायकलींग या खेळामध्ये असलेली सुशिकलाची कामगिरी व प्राविण्य पाहून तिचे पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे पाठविण्यात आले. या क्रीडा प्रकारातील तिच्या कौशल्याचा सराव महाराष्ट्र शासनाच्यावतीने करून घेण्यात आला. या विशेष प्रशिक्षणाच्या बळावर सन २०१४ मध्ये केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक पटकाविले होते.सुशिकला आगाशे या विद्यार्थिनीच्या प्राविण्याची दखल घेऊन भारतीय खेळ प्राधिकरणाने तिची निवड भारतीय संघामध्ये करुन तिला अडव्हांस ट्रेनिंग देण्यात आली. सुशिकलाने आपल्या परिश्रमाच्या बळावर भारताला कास्य पदक मिळवून दिले. जिल्ह्याचे नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर केला. तिच्याच पावलावर पाऊल टाकून भंडारा येथील खेळाडू अश्विन पाटील, मयुरी लुटे, वैष्णवी गभणे, क्रीडा नैपुण्य चाचण्या व क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्र शासनामार्फत भारतीय क्रीडा प्राधिकरण दिल्ली येथे भारतीय संघामध्ये निवड होऊन सरावाकरिता आहेत. या सर्व खेळाडूंचे क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, ए.बी. मरसकोले, संदिप खोब्रागडे, मनोज पंधराम , क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, रविंद्र वाळके यांनी अभिनंदन केले. (नगर प्रतिनिधी)