शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

धान कापणीसाठी शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा. निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकऱ्यांनी धान पिकविला. विविध समस्यांचा सामना करीत आता धान कापणीला आला आहे. हलक्या धानाची कापणी सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे कोणी मजूर कामावर यायला तयार नव्हते. सर्वच जण प्रचारात आणि रॅलीत मग्न असल्याचे दिसत होते.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाची धास्ती : मजुरीचा खर्च मशीनपेक्षा दुप्पट

खेमराज डोये ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव (चौ.) : विधानसभा निवडणूक आणि धान कापणीचा हंगाम एकच आल्याने शेतकऱ्यांना मजुरांचा टंचाईचा सामना करावा लागला. त्यातच मजुरांचा खर्च मशीनपेक्षा दुप्पट असल्याने चौरास भागात शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरलाच अधिक दिसत आहे. शेतशिवारात सध्या हार्वेस्टरची घरघर सुरू असून भात कापणीच्या कामाला दिवाळीच्या तोंडावर वेग आला आहे.
भंडारा जिल्हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा. निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकऱ्यांनी धान पिकविला. विविध समस्यांचा सामना करीत आता धान कापणीला आला आहे. हलक्या धानाची कापणी सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे कोणी मजूर कामावर यायला तयार नव्हते. सर्वच जण प्रचारात आणि रॅलीत मग्न असल्याचे दिसत होते. तसेही गत काही वर्षापासून मजुरांचा टंचाईचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यंदा तर निवडणुकच होती. अशा परिस्थितीत आता शेतकरी यंत्राची मदत घेत आहे. परप्रांतातून आलेले हार्वेस्टर सहज उपलब्ध होत आहे. कमी वेळात भाताची कापणी होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांची पसंती हार्वेस्टरलाच दिसत आहे. त्यातही मजुरीचे दर आणि हार्वेस्टरचे भाडे यात चांगलीच तफावत आहे. हार्वेस्टर स्वस्त पडत असल्याने शेतकरी मशीननेच भात कापणी करीत आहे.
धान पीक साठविणे आणि वाळविण्यासाठी शेतकऱ्यांना ताऱ्यावरची कसरत करावी लागते. मशीनद्वारे भात पिकाची कापणी केली तर शेतकऱ्यांना चार दिवस शेतात, रस्त्यावर धान्य सुकवावे लागते. नंतर ते घरी आणून साठवावे लागतात. याउलट मजुरीने धान कापले तर कापणीचा, धान बांधाईचा खर्च हार्वेस्टरपेक्षा दुप्पट येतो. हार्वेस्टर एकरी ८०० ते दोन हजार रूपये भाडे घेत आहे. मजुरीसाठी एका एकराला साधारणत: पाच हजार रूपये खर्च येत आहे. त्यामुळे शेतकरी मशीनलाच पसंती देताना दिसत आहे.
ग्रामीण भागात आता निवडणुकीनंतर कापणीच्या कामाला वेग येणार असून बहुतांश शेतकरी हार्वेस्टरची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र पवनी तालुक्यातील चौरास भागात दिसून येत आहे.

धान खरेदी सुरू झाली असती तर
भंडारा जिल्ह्यात अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. दिवाळीपूर्वी धान खरेदी केंद्र सुरू झाले असले तर शेतकºयांना सरळ धान खरेदी केंद्रावर नेता आला असता. त्यातून साठवणुकीचा खर्च वाचला असता परंतु आता धान खरेदी केंद्रच सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या घरी धान साठविण्याशिवाय पर्याय नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेती