पाण्यासाठी शेतकऱ्याला मोजावे लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:34+5:30

नेरी येथील गीरीधर मते यांनी आपल्या लाख रुपये खर्च करून शेतीत विंधन विहीर तयार केली. त्यानंतर त्याच्या मुलाने वीज जोडणी मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला. पण, विद्युत जोडणीकरिता प्रतीक्षा करावी लागेल असं त्यांना सांगण्यात आलं. गरज असताना विद्युत जोडणी मिळाली नाही. म्हणजे ताटात वाढलेलं आहे पण खाता येत नाही.

Farmers have to pay for water | पाण्यासाठी शेतकऱ्याला मोजावे लागतात पैसे

पाण्यासाठी शेतकऱ्याला मोजावे लागतात पैसे

Next
ठळक मुद्देनेरी शेतशिवारातील प्रकार : मागणी करूनही जोडणी मिळेना

राजू बांते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी: शेतकऱ्यांच्या जवळ पाणी आहे मात्र विंधन विहीरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी चक्क तासांप्रमाणे शेतकयांला पैसे मोजावे लागत असल्याचाप्रकार नेरी येथे पाहण्यास मिळाला.
आडात आहे पण पोहऱ्यांतून काढता येत नाही, अशी गंमत शेतकऱ्यांची झाली आहे. असाच वास्तविक अनुभव नेरी येथील शेतकºयांच्या बांधावर आला. शेती समृद्ध करण्यासाठी प्रथम सिंचनाची गरज असते. पण, सिंचनाची सोय तर केली जाते मात्र पाणी ओढण्यासाठी विजेची गरज असते. यात सगळं काही अडून बसते.
नेरी येथील गीरीधर मते यांनी आपल्या लाख रुपये खर्च करून शेतीत विंधन विहीर तयार केली. त्यानंतर त्याच्या मुलाने वीज जोडणी मिळण्यासाठी महावितरण कंपनीकडे दीड महिन्यापूर्वी अर्ज केला. पण, विद्युत जोडणीकरिता प्रतीक्षा करावी लागेल असं त्यांना सांगण्यात आलं. गरज असताना विद्युत जोडणी मिळाली नाही. म्हणजे ताटात वाढलेलं आहे पण खाता येत नाही. गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भात रोपं वाचावीत यासाठी त्याची धडपड चालली होती. त्या शेतकºयांनी भाड्यानं डिझेल इंजिन आणला होता. नवीन प्लास्टिक पाईप घेवून आणला.
दोनशे मीटर लांबीच्या अंतरावर भात रोपांना वाचविण्यासाठी त्या शेतकऱ्याची कसरत चालली होती. शेतात सिंचनाची सोय असूनही तीनशे रुपये प्रति तास सिंचन करण्याचे त्या शेतकऱ्याला भाडे द्यावे लागले. मार्च २०१९ पासून शेतावरील विंधन विहीर, विहिरीवर विद्युत जोडणी करण्यात आली नाही. त्यासाठी शासनाकडून निविदा काढण्यात आल्या नाहीत. आता पुन्हा काही दिवस प्रतीक्षा करा असं शेतकºयांना सांगण्यात आले आहे.

दुपारी ते शेतकरी बांधावर भात रोपाला पैसे देवून सिंचन करीत होते. आज मात्र खूप दिवसानी पाऊस बरसला. तो सकाळी बरसला असता तर त्या शेतकऱ्याचे तीन ते चार हजार रुपये वाचले असते. खूप वजन असलेला डिझेल इंजिन शेतात नेण्यासाठी चार लोकांची मदत घ्यावी लागते. एका मालकाने चार चाकी गाडीत डिझेल इंजिन ठेवून तिथून जोडणी त्या विंधन विहीरला केली होती. त्यामुळे ते वजनदार साधन वहन करणे सोपे जात आहे.

Web Title: Farmers have to pay for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.