शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सुखावला! दहा दिवसानंतर वरुणराजा प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

साकोली तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. लाखनी येथे सकाळी ८ वाजेपासून पाऊस कोसळत होता. राष्ट्रीय महामार्गावर आणि सर्व सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. साकोली तालुक्यातील एकोडी परिसरात दमदार पावसाने रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरात सकाळी ७ वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. वीज पुरवठा खंडित झाला होता.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वदूर पाऊस : शेतकऱ्यांवरील संकट टळले, रोवणीच्या कामाला येणार वेग, धानबांध्या तुडुंब

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल दहा दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर गुरुवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, धानपिकाला जीवदान मिळाले आहे. आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी धानाच्या नर्सरीत पेरणी केली होती. पऱ्हे रोवणी योग्य झाले होते; परंतु दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. नर्सरीच्या जमिनीला तडे जात होते.  नर्सरीतील कोवळे पऱ्हे पिवळे पडू लागले होते. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. अशातच बुधवारी सायंकाळपासून पावसाळी वातावरण तयार झाले. रात्री जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून दमदार पावसाला प्रारंभ झाला. भंडारा शहरात पहाटेपासून पाऊस बरसत होता. दुपारी १.३० वाजेपर्यंत पाऊस कोसळला. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला. तुमसर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी रिमझिम पाऊस बरसला होता. गुरुवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील पवनारा, चिचोली, बघेडा, नाकाडोंगरी परिसरात मुसळधार पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. मोहाडीत विजेच्या कडकडाटात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे धानपऱ्ह्यांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहाडीत अंधार पसरल्यासारखे दिसत होते. वीज पुरवठाही खंडित झाला होता. उसर्रा येथेही दमदार पावसाने हजेरी लावली. वरठी परिसरात पावसाने हजेरी लावताच विद्युत पुरवठा खंडित झाला. आंधळगाव परिसरात पहाटे ४ वाजतापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळी जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. आर्द्रा नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. जांब, लोहारा परिसरात सकाळपासूनच रिमझिम पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी सुखावले होते. साकोली तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. लाखनी येथे सकाळी ८ वाजेपासून पाऊस कोसळत होता. राष्ट्रीय महामार्गावर आणि सर्व सर्व्हिस रोडवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. साकोली तालुक्यातील एकोडी परिसरात दमदार पावसाने रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. भंडारा तालुक्यातील जवाहरनगर परिसरात सकाळी ७ वाजेपासून जोरदार पाऊस सुरू झाला. वीज पुरवठा खंडित झाला होता. ठाणा जवाहरनगर मार्गावर शुकशुकाट दिसत होता. पहेला परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांवरील संकट टळले. पवनी तालुक्यातही सकाळपासूनच पाऊस कोसळत होता. दमदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आसगाव (चौ.) परिसरात धानाच्या बांध्या पावसाने पूर्णत: भरल्या होत्या. पवनी-आसगाव मार्गावरील माती वाहून गेल्याने दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागला. अड्याळ येथे सकाळी ७ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत दमदार पाऊस कोसळला. करडी परिसरात पहाटे २.३० वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी आता रोवणीला सुरुवात केली. 

जिल्ह्यात आतापर्यंत ३१९ मिमी पाऊस- भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३१९.६ मिमी पावसाची नोंद झाली, तर गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत १५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दहा दिवसांपासून पावसाने खंड दिला असला तरी जिल्ह्यात १ जून ते ८ जुलै यादरम्यान कोसळणाऱ्या पावसाच्या सरासरी १०३ टक्के पाऊस झाला आहे. गत २४ तासांत भंडारा ४.९ मिमी, मोहाडी ४९.४ मिमी, तुमसर १३.२ मिमी, पवनी १.६ मिमी, साकोली २७.६ मिमी, लाखांदूर ७.१ मिमी आणि लाखनी तालुक्यात २.३  मिमी पावसाची नोंद झाली आहे.

लाखांदूरमध्ये अनेक घरात शिरले पाणी- लाखांदूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. या पावसाने अनेकांच्या घरांत पाणी शिरले. गटारांच्या दुरावस्थेमुळे प्रभाग ५, ८ आणि ९ मधील सुमारे ७० घरांमध्ये पाणी शिरले. त्यात एका माजी नगरसेविकेच्या घराचादेखील समावेश आहे. मुख्याधिकारी डाॅ.सौरभ कावळे यांनी या प्रभागाची पाहणी केली. तेथील जनतेच्या समस्या समजावुन घेतल्या. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले. घरातील धान्य, कपडालत्ता व इतर साहित्य ओले झाले. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. पावसामुळे शेतकरी मात्र सुखावल्याचे दिसत आहे.

रोवणीच्या कामाला वेग- जिल्ह्यात दहा दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने रोवणीचे काम खोळंबले होते. मात्र, गुरुवारी सकाळपासून बरसलेल्या दमदार पावसाने आता रोवणीच्या कामाला वेग येणार आहे. जिल्ह्यात २ लाख ५ हजार ८३२ हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात धानाचे क्षेत्र १ लाख ८३ हजार २५ हेक्टर आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने केवळ २ हजार हेक्टरवरच रोवणी झाली होती. आता रोवणीला वेग येणार आहे.

बावडी मंदिरात शिरले रस्त्यावरचे पाणी- तुमसर शहरातील बावळी मंदिरात गुरुवारी पावसाचे पाणी शिरले. शिवलिंगला पाण्याने वेढा घातला होता. पाण्याच्या निचराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पाणी मंदिरात शिरले. मंदिर कमिटीने अनेकदा नगरपालिका प्रशासनाला माहिती दिली होती. भाजप कार्यकर्ते अर्पित जयस्वाल यांनी नगरपालिका प्रशासनाला सदर समस्या दूर करण्याची मागणी केली.

पारडी येथे वीज कोसळून दोन म्हशी ठार- मोहाडी तालुक्यातील पारडी येथे गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वीज कोसळून दोन म्हशी ठार झाल्या. मोहाडी तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळला. शेतात चरत असलेल्या दोन म्हशींवर अचानक वीज कोसळल्याने दोन्ही म्हशी जागीच ठार झाल्या. शेतकऱ्याचे यामुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात या पावसाने मोठे नुकसान कुठेही झाले नाही.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी