शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

शेतकरी मागणारा नाही तर देणारा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 12:40 AM

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो राबराब राबून धान पिकवतो व स्वत:पेक्षा इतरांना खाऊ घालतो. मात्र निसर्गाची अवकृपा व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना वाईट दिवस आले आहेत. सततची नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेतकºयांना कर्जमाफीची गरज आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : कुंभली येथे जनहित सामाजिक सेवाभावी संस्थातर्फे २१० लाभार्थ्यांना ब्लँकेटचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो राबराब राबून धान पिकवतो व स्वत:पेक्षा इतरांना खाऊ घालतो. मात्र निसर्गाची अवकृपा व शासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना वाईट दिवस आले आहेत. सततची नापिकी, वाढते कर्ज यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. अन्यथा शेतकरी देणारी जात आहे, मागणारी जात नाही. शेतपिकाला जर चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांला मागायचीही गरज पडणार नाही. शेतकरी स्वाभिमानी आहे, लाचार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस शेतकरी शेतमजुर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.जनहित सामाजिक सेवाभावी संस्था भंडाराच्या वतीने कुंभली येथे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी योजनाच्या लाभार्थ्यांना ब्लँकेट वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार आनंदराव वंजारी होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, जि.प. सरपंच आकाश कोरे, माजी सभापती मदन रामटेके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हेमकृष्ण वाडीभस्मे, देवरीचे प्राचार्य अरुण झिंगरे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, उमेद गोडसे, तालुका अध्यक्ष अंगराज समरीत, सरपंच कमल भेंडारकर, भरत खंडाईत, अंताराम खोटेले, ज्योत्सना घोरमारे, जया भुरे, नरेंद्र बुरडे, लता दुरूगकर, पं.स. सदस्य लखन बर्वे, नगरसेवक अनिल निर्वाण, विनोद भुते, सत्यवान हुकरे, प्रदीप मासुरकर उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करून काळा धन आणू असे सांगितले होते. मात्र वर्षाचा कालावधी लोटला तरी एकही काळा धन देशात आला नाही. उलट लहान मोठे व्यवसाय बंद झाले. नोकर भरती बंद झाली. युरीयाची बॅग पूर्वी ५० किलोची होती ती आता त्याच किंमतीत ४५ किलोची झाली. धानाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव देऊ अशी घोषणा केली होती. मात्र धानाला भाव मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी अजुनपर्यंत कर्जमाफी झाली नाही. यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असतानाही आजपर्यंत दुष्काळाची व कर्जमाफीची घोषणा झाली नाही. शेतकºयांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान देऊन बरेच दिवस झाले तरी धानाचे चुकारे मिळाले नाही. भाजप सरकार शेतकरी विरोधी झाले, असा आरोपही पटोले यांनी यावेळी केला.प्रास्ताविक के.वाय. नान्हे यांनी केले.यावेळी त्यांनी जनहित सेवाभावी संस्था भंडारातर्फे दोन वर्षात केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच स्वर्गीय डॉ. बाबुराव फुंडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या समजाकार्याची माहिती विषद केली. यावेळी कुंभली जिल्हा परिषद क्षेत्रातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी अनुदान योजनेच्या एकूण २१० लाभार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.संचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हा महासचिव प्रभाकर सपाटे यांनी केले. कार्यक्रमाला रवि राऊत, सुरेश बघेल, अनिल टेंभरे, निलेश घरडे, यशपाल कºहाडे, प्रविण भांडारकर, अखिलेश गुप्ता व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीNana Patoleनाना पटोले