शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

अड्याळ येथील प्रसिद्ध घोडायात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST

कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर जे काही निर्णय घेण्यात आले त्याला पाठिंबा देत अडयाळ ग्रामस्थांनी यावर्षी यात्रेदरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला स्थगित केल्या ची माहिती हनुमंत देवस्थान कमेटी चे अध्यक्ष भास्करराव पोटवार यांनी दिली आहे .

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दक्षता : हनुमंत देवस्थान कमिटीचा निर्णय

विशाल रणदिवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा चैत्र नवरात्र,मनोकामना पुर्ती ज्योती कलश स्थापना, श्रीराम जन्मोत्सव, श्रीबालाजी रथयात्रा (घोडायात्रा) श्रीमद भागवत सप्ताह, हनुमंत जन्मोत्सव, सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा व महाप्रसादाचे आयोजन हनुमंत देवस्थान व भागवत कमेटी तथा अडयाळ ग्रामस्थांनी केले होते. परंतू कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर जे काही निर्णय घेण्यात आले त्याला पाठिंबा देत अडयाळ ग्रामस्थांनी यावर्षी यात्रेदरम्यान होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला स्थगित केल्या ची माहिती हनुमंत देवस्थान कमेटी चे अध्यक्ष भास्करराव पोटवार यांनी दिली आहे .
भंडारा जिल्ह्यात एकही कोरोना व्हायरसचा रुग्ण आता पावेतो मिळाला नसला तरी त्या विषयी निष्काळजी करणे हे केव्हाही घातक ठरू शकते त्यामुळे आता सतत जागरूक राहणे हेच काळाची गरज आहे. कोरोना व्हायरसची भीती आता ग्रामीण भागातही पोहचली आहे .गर्दी टाळण्यासाठी व कोरोना विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील दारू दुकानासह फुड स्ट्रीट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले ही बंदी ३१ मार्च पर्यंत राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बिअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रूम बार अँड रेस्टॉरंट, देशी विदेशी दारूचे दुकान, सर्व क्लब, पान खर्रा ठेले तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विकणाºया टपऱ्यांचा समावेश आहे तसेच शाळा, महाविद्यालय, आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अड्याळ ग्रामवासी यांना अड्याळ ग्रामीण रुग्णालय तथा आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी यांकडून कोरोना व्हायरस विषयीची तथा त्यावरील उपाय योजनेची माहिती मिळत असली तरी त्यांवर मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करताना नागरिक दिसून येत आहेत,परंतु अडयाळ येथील प्रसिद्ध घोडायात्रे निमित्ताने महाराष्ट्र तथा बाहेर राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात अशा वेळी कोण कुठून येणार याचा नेम नसतो. कार्यक्रमात हजारोच्या संख्येने भाविक सहभागी होतात. यावर लक्ष केंद्रित करणारी यंत्रणा नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. बैठकिला विवेक क्षीरसागर, मधु गभने, शंभु लांबट, बबलु मुनीश्वर इत्यादी ग्रामस्थ व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध श्री बालाजी रथ यात्रा (घोडा यात्रा) निमित्ताने तथा स्वयंभु हनुमंत देवस्थानात हजारो भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच मीना बाजार आता भरणार नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस