शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टीविना रेतीचे सर्रास उत्खनन

By admin | Updated: June 1, 2016 01:49 IST

पवनी तालुक्यात आठ रेतीघाट आहेत. रेतीची वाढती चोरी लक्षात घेता शासनाने रेतीघाट लिलाव केले.

पवनी तालुक्यातील प्रकार : जिल्हा परिषद सदस्याने केली चौकशीची मागणीपवनी : पवनी तालुक्यात आठ रेतीघाट आहेत. रेतीची वाढती चोरी लक्षात घेता शासनाने रेतीघाट लिलाव केले. मात्र लिलाव होऊनही तीच परिस्थती आहे. गुडेगाव रेतीघाटातून रात्रंदिवस रेतीचा उपसा सुरू आहे. शासन नियमाला रेतीघाट मालकाने धाब्यावर ठेवून मनमर्जी कारभार सुरू आहे, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य मनोरथा जांभुळे यांनी केला आहे. गुडेगाव रेतीघाटावरुन रेती नेताना रॉयल्टीसाठी एक हजार रुपये व विनारॉयल्टी रेती पाहिजे असल्यास ५०० रुपये मोजावे लागत आहे. पवनी तालुक्यात हे नियम कुणी ठरविले व त्यावर कुणाचा वरदहस्त आहे, हे कळेनासे झाले आहे. शासनाच्या नियमानुसार रेती घाटावरुन रेती भरुन नेतांनी प्रत्येक ट्रीपला नवीन रॉयल्टी घ्यावी लागते. अशी नोंद तत्काळ द्यावी लागते. मात्र गुडेगाव रेती घाटावरुन नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. ट्रॅक्टर मालकाकडून २०० रूपये घेऊन रॉयल्टी दिल्या जात नाही. ट्रक, ट्रिप्पर सकाळच्या पहिल्या ट्रीपला रॉयल्टी घेतात. मग दिवसभर ५००रुपये देवून विना रॉयल्टीने रेती नेत आहेत. रेतीघाट लिलावापूर्वी महसुल विभागातर्फे प्रभारी तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस यांचे संयुक्त फिरते पथक होते. त्यावेळी दररोज १० ते १५ ट्रॅक्टर ट्रॅक पकडून त्यांचेकडून दंडाची रक्कम वसूल केली जात होती. मात्र हे फिरते पथक भटकांनी दिसत नाही. याचा फायदा रेतीमाफीयाकडून होत आहे. शासनाच्या नियमनानुसार रेतीघाटाचे लिलाव झाल्यावर त्या रेतीघाटाची सीमा निश्चित केली जाते. त्याच क्षेत्रातील रेतीचा उपसा करणे बंधनकारक असते. (तालुका प्रतिनिधी)