शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

धान्य विक्रीसाठी नोंदणीची मुदत वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

यावर्षीपासून शासनाने नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची नोंदणी स्वतः करावयाची आहे. मात्र ८० टक्के शेतकऱ्यांच्या जवळ अद्ययावत भ्रमणध्वनी नसल्यामुळे ते आपल्या पिकाची नोंदणी करू शकले नाही. काहींनी इतरांची मदत घेऊन नोंदणी केली. मात्र यातही अनेक त्रुटी असल्यामुळे त्यांच्या सातबारा उताऱ्यावर धान पिकासह इतर पिकांच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे तलाठ्यांना सातबारा देणे अडचणीचे होत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : शासनाने धान्य विक्रीसाठी करावयाची नोंदणीची अवधी ३० सप्टेंबरपर्यंत ठेवली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना अजूनपर्यंत सातबारा मिळाले नाहीत. त्यामुळे ते नोंदणी करू शकत नाहीत. परिणामी नोंदणीचा अवधी शासनाने वाढवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यावर्षीपासून शासनाने नवीन आदेश काढला आहे. या आदेशानुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची नोंदणी स्वतः करावयाची आहे. मात्र ८० टक्के शेतकऱ्यांच्या जवळ अद्ययावत भ्रमणध्वनी नसल्यामुळे ते आपल्या पिकाची नोंदणी करू शकले नाही. काहींनी इतरांची मदत घेऊन नोंदणी केली. मात्र यातही अनेक त्रुटी असल्यामुळे त्यांच्या सातबारा उताऱ्यावर धान पिकासह इतर पिकांच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळे तलाठ्यांना सातबारा देणे अडचणीचे होत आहे. वेळेवर सातबारा मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचा रोष तलाठी कार्यालयावर दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वीच साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे शेतकऱ्यांनी सातबारा वेळेवर मिळत नाही म्हणून एका महिला तलाठ्याला तलाठी कार्यालयाला कुलूप लावून जेरबंद केल्याची घटना घडली. हे असे प्रकार एकट्या साकोली तालुक्यात नाही तर जिल्ह्यात अनेक गावांत घडत आहेत. तांत्रिकदृष्ट्या अडचणीच्या असलेल्या या सातबारा उताऱ्यामुळे तलाठी हतबल झालेले आहेत, मात्र प्रशासनाकडून अशा कुठल्या सूचना आलेल्या नाही ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन पिकाची नोंदणी करता येत नाही, त्या शेतकऱ्यांची नोंदणी तलाठ्यांनी करावी. त्यामुळे शेतकरी व तलाठी दोघेही अडचणीत सापडलेले आहेत. हा आदेश यावर्षीचाच असून यात थोडीशी शिथिलता द्यावी. ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन पीक नोंदणी झाली नाही त्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी तलाठ्यांनी करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे, तर जुन्याच पद्धतीने शेतकऱ्यांना सातबारा देण्यात यावे व शासकीय धान्य खरेदी केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आलेली नोंदणीची वेळ वाढविण्यात यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. 

धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार थांबवा - धान खरेदी केंद्रातर्फे शेतकऱ्यांना नोंदणीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते. मात्र बरेच धान खरेदी केंद्रावर केंद्रचालकांच्या जवळच्या माणसांची आधीच नोंदणी केलेली असते. परिणामी शेतकऱ्यांना याचा त्रास होतो. त्यामुळे धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती