शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

‘यंग इंडिया के बोल’मधून मांडल्या रोजगाराच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी जिल्ह्यातून बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेचा प्रमुख विषय देशातील सध्यस्थितीत भयावह असणारी बेरोजगारी विषयाला अनुसरुन स्पर्धकांनी उत्कृष्ट मते मांडली. स्पर्धेमधून तीन उत्कृष्ट स्पर्धक निवडण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा युवक काँग्रेसतर्फे आयोजन : जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतीय युवक काँग्रेसतर्फे ‘यंग इंडिया के बोल’ या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन द ज्ञानदिप अ‍ॅकेडमी शास्त्री चौक भंडारा येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा नगरपरिषदेचे महिला व बालकल्याण सभापती जयश्री बोरकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, जिल्हा काँग्रेसचे महासचिव मुकुंद साखरकर, भंडारा शहर काँग्रेसचे प्रभारी कार्याध्यक्ष प्रशांत देशकर, नगरसेवक शमीम शेख, प्यारेलाल वाघमारे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन फाले, शाहीन मून, कमल साठवणे उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेचे ज्ञानदीप अ‍ॅकेडमीचे संचालक तेजपाल मोरे, महेश रणदिवे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, नगरसेविका जयश्री बोरकर, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, प्रशांत देशकर यांनी आपले विचार मांडले.
भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी जिल्ह्यातून बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेचा प्रमुख विषय देशातील सध्यस्थितीत भयावह असणारी बेरोजगारी विषयाला अनुसरुन स्पर्धकांनी उत्कृष्ट मते मांडली. स्पर्धेमधून तीन उत्कृष्ट स्पर्धक निवडण्यात आले. स्पर्धेतील प्रथम विजेत्याला ३००० रुपये द्वितीय विजेत्याला २००० रुपये तर तृतीय विजेत्याला १००० रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र देण्यात आले. स्पर्धेत प्रथम दामीनी मोहतुरे, द्वितीय विक्की सेलोटे व तृतीय क्रमांक राकेश बांते यांनी पटकाविला. विजेत्यांना मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमासाठी राहुल बांते, विलास केजरकर, स्वरुप महाकाळकर, रोहित कावळे, शांतनू भुरे, सुशांत गणवीर, राकेश लांजेवार, कल्याणी कारेमोरे, सुरेश तितीरमारे, निलीमा बांते, छगन वैद्य, आकाश बाभरे, श्वेता ठवकर, सुनील राणे, विकेश निंबार्ते, ग्रीष्मा सतदेवे, महादेव बिसने, राष्ट्रपाल मोरे आदी पदाधिकाऱ्यांसह व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे यांनी केले. संचालन भंडारा विधानसभा युवक काग्रेसँचे अध्यक्ष भूषण टेंभुर्णे यांनी तर आभार जितेंद्र नागदेवे यांनी मानले.यावेळी जिल्ह्यातील स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
 

टॅग्स :Socialसामाजिक