शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांनी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:21 IST

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत पाडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी असलेल्या भरण समतल नसल्याने याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विटा मातीचे भरण समतल करून शाळेचे पटांगणाला सुंदर स्वरुप प्राप्त करून दिले.

ठळक मुद्देधानोरी येथे उपक्रम : शाळेचे पटांगण केले समतल

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : तालुक्यातील धानोरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत पाडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी असलेल्या भरण समतल नसल्याने याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन विटा मातीचे भरण समतल करून शाळेचे पटांगणाला सुंदर स्वरुप प्राप्त करून दिले. माजी विद्यार्थ्यांच्या या श्रमदानाची गावात स्तुती होत आहे.धानोरी येथे जि.प. उच्च शाळेची जीर्ण झालेली कौलारू इमारत पाडण्यात आली होती. या शाळेचे बांधकाम १९६२ मध्ये करण्यात आले होते. बांधकाम विभागाच्या सूचनेनुसार सदर इमारत निर्लेखीत करण्यात आली होती. शाळेच्या पटांगणासमोर खोलगट भागात विटा मातीचे भरण घालण्यात आले होते. मात्र सदर भाग समतल नव्हता. या संदर्भात मुख्याध्यापिका प्रतिभा पारधी यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत याच शाळेचे माजी विद्यार्थी पोळ्याच्या सुटीनिमित्त एकत्र आले. हातात कुदळ, फावडे घेऊन शाळेचे पटांगण समतल करायला सुरुवात केली. अवघ्या दोन तासांच्या श्रमदानाने चिमुकल्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पटांगण समतल करून दिले. यात माजी विद्यार्थ्यांमध्ये करण बारसागडे, अभिषेक नागपुरे, गणेश नान्हे, लखन वाघधरे, रोहित दिघोरे, अजित मनगटे, स्वप्नील पारधी, आदित्य मेश्राम, क्रिश नान्हे, क्रिष्णा दरवरे, रुपेश दरवरे, अक्षय मंडपे, संकेत शिंदे, मंगेश मंडपे, मयूर भुते, शुभम पारधी, स्वप्नील भोयर, नरेश जुमडे तसेच सरपंच नामदेव वाघधरे यांचा समावेश होता. शिक्षक तथा ग्रामस्थांनी या सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.

टॅग्स :Schoolशाळा