शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या आठवड्यातही विद्यार्थी, शिक्षक करताहेत नियमांचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

भंडारा : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर गजबजू लागला. शाळा ...

भंडारा : २७ जानेवारीपासून जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर गजबजू लागला. शाळा सुरू होण्याचा हा दुसरा आठवडा होता. मात्र ज्या प्रमाणे शाळेच्या पहिल्या दिवशी थर्मल स्कॅनिंगसह फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कचा नियमित वापर होत असल्याचेच पाहणीतून दिसून आले.

या संदर्भात लोकमत चमूने भंडारा शहरातील काही शाळांचे अवलोकन केल्यानंतर ही उत्तम बाब निदर्शनास आली. विद्यार्थी शाळेत प्रवेश केल्यानंतर त्यांची थर्मल स्कॅनिंग केली जाते. पालकांच्या संमतीनंतरच या विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतही करण्यात आले. कुठलाही विद्यार्थी किंवा शिक्षक विना मास्क फिरताना आढळून आले नाही. रविवारी सुटीचा दिवस असल्याने वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रार्थनेच्या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगसह अन्य दक्षता घेण्यात आल्याचे दिसून आले. गट क्रमाने विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात येत असल्याचेही यावेळी दिसून आले.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वस्व खबरदारी घेण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगसह प्रत्येक विद्यार्थ्यांने मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे.

-केशर बोकडे, मुख्याध्यापिका शास्त्री विद्यालय, भंडारा

बऱ्याच प्रतीक्षेनंतर शाळांची घंटा वाजला. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाल्याने कोरोना संकटकाळात त्यांची काळजी घेतली जात आहे. नियमांचे पालन केले जात आहे.

-शाहिद कुरैशी, क्रीडा शिक्षक, कटकवार वि. साकोली

दहा महिन्यानंतर चिमुकले विद्यार्थी शाळेत परतले. विद्यार्थ्यांचा हा आनंद कायम राहावा यासाठी नियमांचे पालन करून विद्यार्जन सुरू आहे. यासाठी पालकांचेही सहकार्य लाभत आहे.

-सतीश धुर्वे, सहायक शिक्षक, आमगाव