शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शाखेत ‘इंटरसेफ्टर’ वाहन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. सुसाट वाहनांमुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे. विविध उपाय योजूनही अपघातावर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे. आता अपघातावर नियंत्रण आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून राज्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्र व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असे इंटरसेफ्टर वाहन पुरविण्यात आले आहे. भंडारा जिल्हा वाहतूक शाखेत दोन वाहन दोन दिवसापुर्वी दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देअपघात रोखण्यासाठी उपाय : लेझर स्पीड गन, टिंट मीटर, ब्रिथ अ‍ॅनालायझरची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रस्ते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेत दोन अत्याधुनिक इंटरसेफ्टर वाहन दाखल झाले असून या वाहनातील लेझरस्पिड गन, टिंट मीटर आणि ब्रिथ अ‍ॅनॉलायझरच्या माध्यमातून वाहनांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे सोयीचे होणार आहे.राज्यात रस्ता अपघाताचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. सुसाट वाहनांमुळे निष्पाप जीवांचा बळी जात आहे. विविध उपाय योजूनही अपघातावर नियंत्रण मिळविणे कठीण जात आहे. आता अपघातावर नियंत्रण आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी शासनाकडून राज्यातील महामार्ग पोलीस मदत केंद्र व जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेत अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज असे इंटरसेफ्टर वाहन पुरविण्यात आले आहे. भंडारा जिल्हा वाहतूक शाखेत दोन वाहन दोन दिवसापुर्वी दाखल झाले आहेत. एक वाहन जिल्हा वाहतूक शाखेला आणि एक गडेगाव येथील महामार्ग पोलीस पथकाकडे देण्यात आले आहे.या वाहनात लेझरस्पिड गन असून त्याद्वारे वाहनांचा वेग मोजता येणार आहे. सदर लेझरस्पिड गनचा वापर करून आणि त्यातील कॅमेºयाच्याद्वारे वेग ठरविणे शक्य होणार आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाºया वाहनांवर कारवाई केली जाईल. त्यासाठी वाहन मालकाच्या मोबाईलवर तात्काळ संदेश जाईल. सदर यंत्रणा इंटरनेटद्वारे कार्यान्वीत राहणार आहे. यासोबतच या वाहनात टिंट मीटर उपलब्ध आहे. काचांवरील काळ्या रंगाच्या फिल्मची तपासणी याद्वारे केली जाईल. काळ्या रंगाची फिल्म ८० टिंटपेक्षा अधिक असता कामा नये, काळी फिल्म सदोष असल्याचे या उपक्ररणाद्वारे आढळून आल्यास मोटरवाहन कायद्यानुसार दंड आकारणी करण्यात येणार आहे.तसेच यात ब्रेथ अ‍ॅनालायझर उपकरण राहणार असून मद्यप्राशन करणाºया वाहन चालकाची तात्काळ तपासणी केली जाईल. सदर उपकरणाद्वारे वेळीच प्रिंट काढून माहिती प्राप्त होईल. सदर चार वाहने जिल्हा वाहतूक शाखेच्या माध्यमातून जिल्हाभर तपासणी मोहीम राबविणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविली जाणार असून मोटरवाहन कायद्याच्या उल्लंघन करणाºया वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सी.एस. चकाटे यांनी सांगितले.वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, अपघात टाळण्यासाठी वेग नियंत्रीत ठेवावा, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.-अरविंद साळवे, जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस