शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

एसटीत राखीव जागांवर अतिक्रमण

By admin | Updated: June 6, 2016 00:35 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंगांसह, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर धडधाकट प्रवासीच अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते.

सेवाभावी योजनांचा फज्जा : लाखांदूर परिसरात प्रवाशांची गैरसोयलाखांदूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपंगांसह, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर धडधाकट प्रवासीच अतिक्रमण करीत असल्याचे दिसून येते. वाहकाकडून याबाबत कुठलेही सहकार्य मिळत नसल्याने महामंडळाच्या सेवाभावी योजनांचा फज्जा उडाला आहे. अपंग प्रवाशांना एसटीत चढता-उतरताना चालक-वाहकांनी मदत करणे आवश्यक आहे. तशी प्रत्येक बसच्या दरवाज्यावर सूचनादेखील लिहिलेली असते. प्रत्यक्षात ही सूचना केवळ नावाला असून काही अपवाद चालक-वाहक वगळता कोणीच अपंग व ज्येष्ठ नागरिकांना कोणीच मदत करीत नसल्याचे दिसून येते. अपंगांना तिकीट दरात सवलतीशिवाय कुठल्याच सोयी-सुविधा दिली जात नाही. शिवाय अपंगांच्या राखीव जागांवर धडधाकट व्यक्ती बसल्यावर त्यांना वाहक किंवा चालक उठवीत नाही. अपंग व्यक्ती बसमध्ये चढताना किंवा उतरताना अनेक प्रवासी त्यांच्याकडे केवळ बघण्याची भूमिका घेतात. परंतु त्यांना मदत करण्यास कुणी पुढे येत नाही, हे वास्तव आहे. अनेकांना मदत करण्यास कमीपणा वाटतो. काही जणाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने यातून सामाजिक बांधिलकी हरविल्याचे दिसते. याशिवाय प्रवाशी निवाऱ्याजवळ जेव्हा प्रवासी एस टी ची प्रतीक्षा करत असतात तेव्हा वाहक बस किती तरी पुढे उभी करुन प्रवाशाना धावून बस मध्ये चढण्यास बाध्य करीत असल्याचे चित्र पंचायत समितीपुढील बस स्थानकावर व शिवाजी टी. पाईंट्वर दररोज दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)सौजन्य मोहिमेचे तीनतेराएसटी महामंडळाने प्रवाशांशी सौजन्याने वागण्याचे ठरवून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यस्तरावरुन ही योजना जाहीर झाली असून एसटी वाहक व चालकांनी प्रवाशांशी सौजन्याने आणि सन्मानपूर्वक वागावे यासाठी यापूर्वी राज्य परिवहन विभागाने चालक व वाहकांना प्रशिक्षणही दिले होते. वाहकांनी बस निघण्यापूर्वी प्रवाशांना नमस्कार करून संपूर्ण माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. परंतु अशा प्रकारचे सौजन्य तर सोडाच अपंग, महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यास वाहक कधी प्रयत्न करताना दिसत नाही.