शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाने काेंडला बाजाराचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

पालिका प्रशासनाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या माेठा बाजार परिसरातील व्याप्ती माेठी आहे. काेराेना संक्रमण काळात आठवडी बाजारासह व्यापारी लाईनमध्ये माेठी अवकळा पहायला मिळाली हाेती. हळूहळू रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा येथे रेलचेल वाढली आहे. राेज लाखाेंची उलाढाल हाेत असली तरी काेविड नियमांची पायमल्ली हाेत आहे. मुख्य बाजार पेठेतील अन्नपुर्ण माता मंदिर चाैक ते बसस्टाॅपकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणाचा विळखा पहायला मिळताे.

ठळक मुद्देभंडारा शहरातील प्रकार : माेठा बाजार परिसरात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकीकडे काेराेना रुग्ण संख्या कमी हाेण्याच्या पाश्र्वभूमीवर नियमानुसार जिल्हा प्रशासनाने नियम शिथिल केले तर दुसरीकडे या नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या माेठा बाजारपेठेत दिसून येत आहे. अतिक्रमणाने या बाजाराचा श्वास काेंडला असून ऐन काेराेना महामारीच्या संक्रमणात साेशल डिस्टन्सिंगचा सर्रास फज्जा उडत आहे.पालिका प्रशासनाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या माेठा बाजार परिसरातील व्याप्ती माेठी आहे. काेराेना संक्रमण काळात आठवडी बाजारासह व्यापारी लाईनमध्ये माेठी अवकळा पहायला मिळाली हाेती. हळूहळू रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा येथे रेलचेल वाढली आहे. राेज लाखाेंची उलाढाल हाेत असली तरी काेविड नियमांची पायमल्ली हाेत आहे. मुख्य बाजार पेठेतील अन्नपुर्ण माता मंदिर चाैक ते बसस्टाॅपकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणाचा विळखा पहायला मिळताे. सांगूनही वारंवार रस्त्यारच दुकाने थाटली जातात. फेरीवाल्यांनी जणू येथे कहरच केला आहे. परिणामी कर देवून दुकाने नियमात चालविणाऱ्यानी काय करावे हा माेठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात राेज लहान माेठे भांडण तंटे हाेत आहेत. याकडे मात्र पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.अतिक्रमण काढल्यानंतर आठवड्यातून एकदा भरारी पथकाचे वाहन येथून गस्तीवर पाठविल्यास अतिक्रमणाला चाप बसू शकताे. परंतु एकदा कारवाई झाल्यानंतर तेथे बघितले सुध्दा जात नाही. परिणामी अतिक्रमण धारकांचे मनसुबे अधिकच बुलंद हाेत आहे.

महिन्याभरापूर्वी झाली हाेती कारवाई-  रस्त्यावर शेड काढून दुकानदारी थाटणाऱ्या अशा अतिक्रमण धारकांवर पालिका प्रशासनाने जेसीबीचा बडगा उभारला हाेता. मात्र दुसऱ्या दिवसापासून अतिक्रमण जैसे थे झाले आहे. अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहितीही या अतिक्रमण धारकांना मिळत असल्याची धुसपूस ऐकावयास मिळत आहे. रस्त्यापर्यंत दुकाने थाटल्याने येणाऱ्या ग्राहकांचे वाहन पार्किंग करायला कुठेच जागा नसते. ऐन काेराेना महामारीच्या काळात नियमांचे पालन करणे तर साेडाच अतिक्रमणाच्या नावाखाली जागा हडपण्याचा डावही रचला जात आहे. याकडे पालिका प्रशासन लक्ष देणार काय असा सवाल येथील नियमित कर भरणाऱ्या दुकानदार विचारित आहेत.-  याच बाजार परिसरात जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. रस्त्यावर दुकानदारी थाटून बसलेल्यांवर पाेलीस प्रशासनाचे वचक नसल्याचेच दिसून येते. येथे कुठलेही नियाेजन नसल्याने लहान माेठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काेविड नियमांचे पालन हाेत नसताना जुन्या समस्याकडेही सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. दुकानांचे शेड लावणे व ते त्वरित काढणे यासाठी दुकानदार चाणाक्ष झाल्याचे दिसून येते. महिन्याभरापूर्वी झालेल्या कारवाईनंतर आतातर अतिक्रमणाने चांगलाच हैदाेस केला आहे. चक्क मुख्याधिकाऱ्यांनी येथून आपले तरी वाहन काढून दाखवावे असा उपराेधीक प्रश्नही दुकानदार विचारतात. या बाबीवरुन अनेकदा तु-तु-मै-मै व हाणामारीही झाली आहे. कारवाई संदर्भाने प्रशासन एखाद्या अनुचित घटनेची तर वाट बघत नाही ना? असा सुरही येथे ऐकायवास मिळत आहे. यावर कारवाई हाेणे गरजेचे बनले आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणMarketबाजार