शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय व सामाजिक संघटनांचा ईव्हीएमविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:45 IST

निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली जात आहे. ईव्हीएमविरोधात अनेक आंदोलने केलीत. निवेदने देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निवडणूक आयोगाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली जात आहे. ईव्हीएमविरोधात अनेक आंदोलने केलीत. निवेदने देण्यात आले. यापुढे जनता ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील राजकीय पक्षांकडून दिला जात आहे.निवेदनानुसार, लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले. कुणाचाही विश्वास बसणार नाही अशा धक्कादायक निकालामुळे मतदारही अचंब्यात आहेत. यामुळे पराभूत झालेल्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मागील दोन महिन्यांपासून देशभरात यावर चर्चा होत आहे. मात्र याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारून येणाºया निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. निवडणूक होत असताना पारदर्शकता असली पाहिजे. प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमचा शोध लावला असतानाही त्याचा वापर करीत नसून तेथे बॅलेट पेपरवर निवडणुका होत आहेत. याचाच अर्थ ईव्हीएममध्ये फेरफार करता येते. सत्ताधारी भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना ईव्हीएम विरोधात आहेत. निवडणूक आयोगाचा याबाबतीत एकतर्फी कारभार सुरू आहे. ईव्हीएम विरोधात सर्वसामान्य नागरीक देखील असताना त्याकडे दुर्लक्ष होत असून आता त्याविरोधात लोकलढा उभारावा लागेल असा सूर राजकीय पक्षांच्या नेत्यांचा निघत आहे. येणारी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेतली पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला हवी ही नागरिकांची भावना आहे. जपान, नेदरलँड आणि अमेरिका या देशांमध्ये ईव्हीएमची चीप तयार होते. तर ज्या देशांनी ईव्हीएमची निर्मिती केली किंवा पध्दत अंगिकारली त्या देशांनीही आता ईव्हीएमची पध्दत बाजूला ठेवली आहे. भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे. मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेच्या मतांवर डल्ला मारला जात आहे. त्यामुळे ईव्हीएम बंद होणे काळाची गरज आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष ईव्हीएमचा विरोध करीत असताना निवडणूक आयोगाने दखल घेणे क्रम प्राप्त ठरते. मात्र त्यांच्या कारभारावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात आली आहे. ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अशा घोषणा देत आंदोलने काढली जात आहेत.

 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनElectionनिवडणूक