शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बहीण व लहान जावई निघाले रोशनचे मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 05:00 IST

मोठी बहीण मनीषा ईश्वर चुधरे (३०), रा. कांद्री, लहान जावई हितेंद्र रतिराम देशमुख (२९) आणि प्रेम उमाचरण सूर्यवंशी (२२), रा. जांब, ता. मोहाडी अशी आरोपींची नावे आहेत. रोशन रामू खोडके (२८), रा. कांद्री असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत बोंद्री ते पांजरा रस्त्यावरील नाल्यात मृतदेह आढळून आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : सख्खी मोठी बहीण व लहान जावयाने मित्राच्या मदतीने कांद्री येथील तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याचे पुढे आले आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना जेरबंद केले असून, पोलिसांपुढे त्यांनी खुनाची कबुली दिली.मोठी बहीण मनीषा ईश्वर चुधरे (३०), रा. कांद्री, लहान जावई हितेंद्र रतिराम देशमुख (२९) आणि प्रेम उमाचरण सूर्यवंशी (२२), रा. जांब, ता. मोहाडी अशी आरोपींची नावे आहेत. रोशन रामू खोडके (२८), रा. कांद्री असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी त्याचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत बोंद्री ते पांजरा रस्त्यावरील नाल्यात मृतदेह आढळून आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. रोशनचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, खून कोणी केला हे मात्र पुढे येत नव्हते. ठाणेदार सुरेश मट्टामी यांनी या प्रकरणाचा तपास करून अवघ्या चार तासांत रोशनची मोठी बहीण, लहान जावई आणि जावयाचा मित्र या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता तिघांनी खून केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध भादंवि ३०२, २०१, १०९, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीने नेऊन दारू पाजून केला खून- रोशन हा मद्याच्या आहारी गेला होता. तो नेहमी मोठ्या बहीण व जावयाला त्रास देत होता. शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. त्यामुळे मनीषा व तिचा पती ईश्वर नेहमी संतापलेले असायचे. यातूनच मनीषाने आपल्या सख्ख्या भावाचा काटा काढण्याचे ठरविले. लहान जावई व त्याच्या मित्राच्या मदतीने खून करण्यात आला. बुधवारी सायंकाळी त्याला दुचाकीवरून पांजरा शेतशिवारात नेले. तेथे त्याला दारू पाजून गळा दाबला. एवढेच नाही तर त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकला. त्यात तो ठार झाल्यानंतर त्याला तलावात फेकले, अशी कबुली दिली.

रोशन बहिणीकडेच झाला लहानाचा मोठा- रोशन खोडके याचे आई-वडील लहानपणीच मरण पावले. त्यामुळे त्याला मोठी बहीण मनीषा चुधरे आपल्या घरी घेऊन आली. अगदी लहानपणापासून तो मनीषाकडे राहत होता. मोलमजुरी करायचा. त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले आणि या दारूनेच त्याचा घात केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस