शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडीत कृत्रिम भारनियमनाने पाणीटंचाई

By admin | Updated: July 3, 2016 00:24 IST

देव्हाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला. विहिरीचा उपसा ग्रामपंचायतीने केला नाही.

जलवाहिनीला गळती : नियोजनाचा अभाव, ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हतुमसर : देव्हाडी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठला. विहिरीचा उपसा ग्रामपंचायतीने केला नाही. मुख्य जलवाहिनी वारंवार फूटत असल्याने नागरिकांना महिन्याभरापासून केवळ एकच वेळ पाणी मिळत आहे. पाणी वितरीत करताना जून्या वस्तीत अधिक वेळ पाणीपुरवठा केला जातो. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतीमध्ये नियोजनाचा अभाव आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.देव्हाडी गावाची लोकसंख्या सुमारे साडे सहा हजाराच्यावर आहे. तालुक्याची सर्वात मोठी व श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे. तुमसर-गोंदिया राज्य महामार्ग व मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर वसले आहे. वैनगंगा नदी येथून केवळ तीन कि़मी. अंतरावर आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर गोंदिया मार्गावर आहे. सुमारे ३० वर्षापुर्वी ग्रामपंचायतीने येथे विहीर बांधकाम केले होते. गाव दोन भागात विभागले गेले आहे. मागील एका महिन्यापासून येथे नागरिकांना केवळ सकाळी पाणी देण्यात येते. विहिरीने तळ गाठला आहे. पाच वॉर्डात पाणी वितरीत करण्याच्या वेळा ग्रामपंचायतीने निश्चित केल्या आहेत. जून्या वस्तीत मात्र बराच वेळ पाणी देण्यात येते. येथे दूजाभाव करण्यात येत आहे. सायंकाळी येथे महिलांना विहिरीतून पाणी काढावे लागते. विहीरीत पाण्याचे स्त्रोत आहेत, परंतु ग्रामपंचायतीने विहीरीतील गाळ काढला नाही. त्यामुळे पाण्याचा येवा विहीरीत येत नाही. उड्डाणपूल बांधकाम करताना येथे मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळेही पाणी नागरिकांना मिळाले नाही. देव्हाडीवासीयांना दररोज ५० हजार लिटर पाणी लागते. ग्रामपंचायतीने येथे नियोजन न केल्याचे दिसून येते. ग्रामविकास अधिकारी दर्जाचे कर्मचारी येथे कार्यरत आहे. परंतु येथे नियोजनशुन्य कारभारामुळे नागरीक त्रस्त दिसत आहेत.(तालुका प्रतिनिधी)