शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 24, 2014 23:17 IST

बैलांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोळा सणावर यावर्षी दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. एकीकडे पाऊस नाही दुसरीकडे कडक ऊन्ह.

भंडारा : बैलांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोळा सणावर यावर्षी दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. एकीकडे पाऊस नाही दुसरीकडे कडक ऊन्ह. यामुळे पीके करपायला लागले असतांना आनंदोत्सव कसा साजरा करावा, असाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. परिणामी बाजारपेठेमध्ये बैलांच्या सजविण्याच्या वस्तूंच्या खरेदीत कमालिची घट आली आहे. श्रमाचा पुजारी म्हणून बैलाला संबोधल्या जाते. बैलाच्या सहाय्याने वर्षभर शेतीची कामे केली जातात. या निष्काम कर्माचे उपकार फेडावे, यासाठी पोळ्याच्या सणाचे आयोजन करण्यात येते. यादिवशी बैलांची पूजा करून त्यांना गोडधोड जेवू घातले जाते. शेतकरी कुटुंब बैलांसमोर नतमस्तक होऊन त्याला प्रणाम करतात. प्रत्येक गावांमध्ये पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जातो. महादेवाकडे बैलजोडीला नेण्यापूर्वी बैलांना सजविले जाते. सजविण्यासाठी बेगड, रंग, झुल, नवीन वेसन, घुंगरू आदींची खरेदी शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात करीत असतात. पोळ्याच्या सणाच्या १५ दिवसांपूर्वीपासून ही खरेदी सुरू होते. आठवडी बाजारातून बैलांना जेऊ घालण्यासाठी नवीन टोपली, विविध प्रकारच्या भाज्या, पाय धुण्यासाठी लहान तांबूला खरेदी केले जाते. हे सर्व खरेदी करताना शेतकऱ्यांमध्ये एकप्रकारचा उत्साह दिसून येत होता. यावर्षी मात्र शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून येत आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीपासून धक्के देणाऱ्या पावसाने मागील २० दिवसांपासून कायमची दडी मारली आहे. त्यामुळे रोवण्याची कामे रखडली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे. अशा शेतकऱ्यांंचे पीक करपायला लागले आहे. काही शेतकऱ्यांंचे तर धानाचे पऱ्हे करपणे सुरू झाले आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन होणार की नाही, या चिंतेत शेतकरी आहे. पोळ्याचा सण धानाची रोवणी झाल्यानंतर येतो. या कालावधीत हिरवेगार पीक शेतात डोलत असते. शेतीसाठी खर्च झाल्यामुळे शेतकऱ्यांजवळ पैसा नसला तरी हिरवेगार पीक त्याच्या मनात नवचैतन्य निर्माण करते. त्यामुळे वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घेऊन पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्याकडे कल असतो. यावर्षी मात्र पिकच करपायला लागल्याने कर्ज काढण्याची त्याची हिंमत राहिली नाही. परिणामी पोळ्याचा सण आला असतांनाही बैलांच्या साजाच्या वस्तूंची खरेदी पाहिजे, त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसून येत आहे. उदार अंत:करणाचा बळीराजा यावर्षी त्याच्या साथीदाराला सजविण्यासाठी व त्याचा आनंदसोहळा साजरा करण्यासाठी हात आखुडता घेत आहे. (शहर प्रतिनिधी)