शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपीने लावली घराला आग

By admin | Updated: June 24, 2016 01:22 IST

एका मद्यपीने स्वत:च्या घराला आग लावली. यात घराचे साहित्य जळून खाक झाले. सुमारे एक लाखाचे विविध साहित्य आगीत राख झाले.

तुमसर : एका मद्यपीने स्वत:च्या घराला आग लावली. यात घराचे साहित्य जळून खाक झाले. सुमारे एक लाखाचे विविध साहित्य आगीत राख झाले. आगीनंतर मुलांना जाळले असा आरडाओरड केल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. घटनास्थळी अग्नीशमन पथक तथा पोलीस दाखल झाले. सुदैवाने घरात अन्य सदस्य नव्हते. पोलिसांनी मद्यपीला ताब्यात घेतले.श्रीराम नगरातील रहिवाशी शोभेलाल पारधी (४७) याने बुधवारी दुपारी २ च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत स्वत:च्या घराला आग लावली व स्वत: खोलीत काही वेळ थांबला. घरातून धूर निघतानी घराजवळील नागरिक धावून गेले तेव्हा मद्यपी शोभेलाल याने मी स्वत:च आग लावली व घरात कुटूंबियांना जाळले असे सांगू लागला. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.या घटनेची माहिती अग्नीशामक विभाग व तुमसर पोलिसांना स्थानिकांनी दिली. तुमसर नगरपरिषदेचे अग्नीशामक पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले. दरम्यान शोभेलाल यांच्या घरातील सोफासेट, टी.व्ही. संगणक, होम थियेटर आणीत भस्म झाले. सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. शोभेलाल यांची पत्नी व दोन मुली लाखनी येथे गेल्या होत्या. घरात व भाडेकरू यांच्याकडे गॅस सिलिंडर सुरू होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शोभेलाल याला तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतले. (तालुका प्रतिनिधी)