शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
2
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
4
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
5
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
6
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
7
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
8
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
9
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
10
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
11
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
12
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
13
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
14
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
15
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
16
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
17
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
18
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
19
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
20
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षितांकडून होणार घरगुती गॅस जोडणीची पाहणी

By admin | Updated: July 14, 2014 23:48 IST

घरगुती गॅस वापरादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी नवनी मोहिम १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने ज्या ग्राहकांकडे एचपी व इंण्डेन कंपनीचे गॅस कनेक्शन आहे,

भंडारा : घरगुती गॅस वापरादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी नवनी मोहिम १५ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने ज्या ग्राहकांकडे एचपी व इंण्डेन कंपनीचे गॅस कनेक्शन आहे, अशा गॅसधारकांच्या कनेक्शनचे निरीक्षण कंपनीच्या प्रशिक्षित प्रतिनिधींकडून करण्यात येणार आहे. यामुळे घरगुती गॅस वापरादरम्यान होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळणार असल्याने गॅस धारकांच्या सुरक्षिततेसाठीच गॅस कंपण्यांचा हा पुढाकार म्हणावा लागेल.
काही दिवसांपूर्वी पवनी तालुक्यात भुयार या गावात घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता. यामागील कारणाचा शोध घेतला असता गॅस कनेक्शन वापरताना आयएसआय प्रमाणित नसलेल्या उपकरणांचा वापर केला असल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पेरेशन व इंडियन आॅईल कॉर्पाेरेशनद्वारे प्रत्येक घरगुती गॅसधारकांच्या कनेक्शनची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भंडारा, लाखनी, पवनी, साकोली या तालुक्यात १५ जुलैपासून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने कंपनीचे प्रशिक्षित प्रतिनिधी घरोघरी जाऊन अत्यल्प दरात गॅसधारकांना साहित्याची व सुरक्षिततेविषयी माहिती देणार आहे. गॅस वापरताना आयएसआय प्रमाणित उपकरणांचा वापर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असल्याने ज्या ग्राहकांकडे आयएसआय उपकरणे नसतील त्यांना त्वरित उपकरणे बदलवून दिले जाणार आहेत.
यासाठी कंपनीची रितसर पावतीही ग्राहकांना देण्यात येणार आहे. आॅईल कंपन्याकडून घरगुती ग्राहकांचा अपघातादरम्यान थर्ड पार्टी विमा कंपनीकडूनच काढण्यात येतो. ज्या ग्राहकाने कंपनीच्या निरीक्षणाना प्रतिसाद दिला नाही, त्या ग्राहकांना या विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक ग्राहकाने कंपनीच्या निरीक्षणाला प्रतिसाद देऊन भविष्यातील अपघात टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)