शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

‘मी आहे ना’, असे सांगत डॉक्टर जिंकतात रुग्णांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:01 IST

कोरोनाचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. साधा ताप आणि खोकला झाला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. असे रुग्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येताच चेहºयावर प्रचंड तणाव आणि घाबरलेल्या अवस्थेत पोहोचतात. मात्र येथे येणाºया प्रत्येक रुग्णाशी प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन वसंतराव बाळबुद्धे आपुलकीने संवाद साधतात.

ठळक मुद्देकोरोना संकटातील देवदूत : तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ‘मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता, निश्चितच बरे व्हाल, माझ्यावर विश्वास ठेवा’, असा संवाद साधित तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन बाळबुद्धे रुग्णांशी संवाद साधून येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचे मन जिंकत आहे. कोरोनाच्या संकटाने धास्तावलेले रुग्ण येथे आले की, आपुलकीच्या संवादाने आत्मविश्वासाने घरी जातात.
कोरोनाचे नाव घेताच प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. सर्वत्र रुग्णांची संख्या वाढत आहे. साधा ताप आणि खोकला झाला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. असे रुग्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येताच चेहºयावर प्रचंड तणाव आणि घाबरलेल्या अवस्थेत पोहोचतात. मात्र येथे येणाºया प्रत्येक रुग्णाशी प्रभारी अधीक्षक डॉ. सचिन वसंतराव बाळबुद्धे आपुलकीने संवाद साधतात. रुग्णांनाच नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मोठा धीर देतात. स्वत:चा मोबाईल क्रमांक व आपल्या सहकारी डॉक्टरांचा मोबाईल क्रमांक सोशल मिडियावर देवून रुग्णांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन करतात.
डॉ. सचिन बाळबुद्धे एमबीबीएस, एमडी (मेडिसीन) रशिया व एमडी अ‍ॅनेस्थेशिया आहेत. भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात सहा महिने सेवा दिल्यानंतर गत सहा वर्षांपासून तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. येथे दररोज ८०० ते ९०० रुग्ण तपासणीसाठी येतात. सध्या रुग्णांची संख्या ३०० ते ४०० झाली आहे. येथे अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू असून रुग्णांना भरती केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. संशयीत आढळल्यास त्याला भंडारा येथे रेफर केले जाते. महानगरातून आलेल्या व्यक्तींची तपासणी करून त्यांचे अलगीकरण केले जाते. सर्दी, खोकला, ताप असलेला रुग्ण उपचार करण्यास आला की सावधगिरी बाळगून उपचार केले जातात. त्यामुळे सर्वांना दिलासा मिळत आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धीर
कोरोना विषाणूची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. वैद्यकीय कर्मचारीही यातून सुटले नाही. अशा कर्मचाºयांना डॉ. बाळबुद्धे धीर देतात. स्वत: रुग्णांच्या सेवेला प्राधान्य देतात. डर के आगे जीत है, असे सांगून समुपदेशन करतात. डॉक्टरांचा धर्म आहे रुग्णांची सेवा. त्यामुळे कुणालाच निराश करू नका, असे डॉक्टर सांगतात. रात्री कितीही वाजता डॉक्टरांना फोन केला ती सेवेसाठी हसतमुखाने उपस्थित असतात. कोरोनाच्या संकटात तुमसर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. बाळबुद्धे रुग्णांसाठी देवदूत ठरले असून अशा देवदूताला ‘लोकमत’चा सलाम.

कोरोची भीती निश्चित बाळगली जाते. परंतु डॉक्टरांनी या बिकट स्थितीत रुग्णांना आधार देवून सेवेचे व्रत स्विकारण्याची गरज आहे. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठी जबाबदारी आली असून हिमतीने समोर जाण्याची गरज आहे. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा ही ब्रीद प्रत्येक्षात साकारण्याची वेळ आली आहे.
-डॉ. सचिन बाळबुद्धे, प्रभारी अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, तुमसर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर