शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

‘प्राजक्ता’ला देवदूत तारणार काय?

By admin | Updated: September 7, 2016 00:29 IST

घरात अठरा विश्व दारीद्र्य. अशात इयत्ता चवथीत असताना तिला ‘पॅपीलोमा’ या श्वास नलिकेशी संबंधित दुर्धर आजाराने ग्रासले. मागील आठ वर्षांपासुन तिचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे.

घेतेय गळ्यातून श्वास : संघर्ष जीवन-मरणाचा, मदतीची प्रतीक्षावरठी : घरात अठरा विश्व दारीद्र्य. अशात इयत्ता चवथीत असताना तिला ‘पॅपीलोमा’ या श्वास नलिकेशी संबंधित दुर्धर आजाराने ग्रासले. मागील आठ वर्षांपासुन तिचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. ही चित्रपटाची कहाणी नव्हे तर एका मुलीच्या जीवन - मरणाचा प्रश्न बनला आहे. प्राजक्ता खांडेकर रा. वरठी असे या मुलीचे नाव आहे. जगण्याची इच्छा असतानाही दुर्दम्य आजाराने आपल्याला मरण येणार काय? हा प्रश्न तिच्या डोळयात आग म्हणून पेटत आहे. आर्थिक अडचणीतून तारूण जीवनाची उमेद दाखविणाऱ्या दानशुर देवदुतांची तीला प्रतीक्षा आहे. संघर्ष काय असतो, ही बाब प्राजक्ताला बघितल्यावर कळते. ती १७ वर्षाची असुन बारावीत आहे. शालेय शिक्षण पुर्ण करून हलाखीच्या परिस्थितीतही मृत्युशी झुंज देत आहे. होते नव्हते सर्व पैसे, व पर्याय संपले. मुलीला जगवायचे कसे, हा प्रश्न तिच्या कुंटुंबियांसमोर उभा आहे. प्राजक्ता ही सध्या वरठी येथे आपल्या आजीकडे राहते. चौथ्या वर्गात असताना तिला ‘पॅपीलोमा’ नामक श्वास नलीकेच्या आजाराचे लक्षण आढळखाद्व हा एकप्रकारचा कॅन्सरचा भाग; पण बरा होवु शकतो. ती पुन्हा सामान्य जीवन जगु शकते. आई,आजी, मामा तिला वाचवण्यासाठी दवाखान्याच्या चकरा मारीत आहेत. ती सध्या सम्राट अशोक विद्यालय निहारवाणी येथे शिकत होती. आजारामुळे तिला समाजाकडून दुय्यम वागणुक मिळत असल्याने ती खचली. पण आजाराबरोबर लढण्याची तीने हिंमत सोडलेली नाही. २१ मार्च २०१२ पासुन ते ८ जून २०१६ पर्यत नागपुर येथील इंदीरा गांधी शासकीय मेडीकल कॉलेज येथे तिच्यावर सात वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर त्यानी तीला उपचाराकरीता मुंबईला पाठवले. दोन दिवसांपुर्वी मुंबई येथुन शस्त्रक्रिया करून ती परतली. उपचार आणि शस्त्रक्रियेकरीता दोन ते तीन लक्ष रुपयांची गरज आहे. शस्त्रक्रिया झाल्यापासुन प्राजक्ता ही गळ्यातून टाकलेल्या नळीव्दारे श्वास घेत आहे. शाळेकडून आणि परीचित, आ. चरण वाघमारे यांनीही मदत केली होती. शासनस्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी उपलब्ध झाल्यास प्राजक्ताचा लढा यशस्वी होवू शकतो. दानशुरांची गरज आहे. (वार्ताहर)पोलीस सहायता निधीची अपेक्षाप्राजक्ता ची आजी देवागना शेंडे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आहे. ती सध्या प्राजक्ता, तिची आई व लहान बहीणीचा सांभाळत असुन त्यांना एक मुलगा आहे. प्राजक्ता च्या उपचाराकरीता वारंवार दवाखाण्यात जावे लागत असल्यामुळे त्याचे काम सुटले. कुंटबाच्या पालनपोषणासह नातनीच्या उपचाराची जबाबदारी पेलवणे शक्य नाही. पोलीस विभागामार्फत असलेल्या कल्याण निधीतुन मदत मिळण्यासाठीही पायपीट सुरु आहे.