शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांची कामे प्राधान्याने करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:50 IST

जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभे न ठेवता त्यांची कामे प्रथम प्राधान्याने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे केले. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्या साधून जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दिव्यांग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देशांतनू गोयल : जिल्हा कचेरीत दिव्यांग दिन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना रांगेत उभे न ठेवता त्यांची कामे प्रथम प्राधान्याने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी येथे केले.जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्या साधून जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दिव्यांग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, प्रत्येक मतदार लोकशाहीचे अभिन्न अंग आहे. त्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देश्याने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणूक’ हे घोष वाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये समावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नोंदणी करणे व मतदानाचे वेळी त्यांना विशेष सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हयात ३२०० अपंग मतदाराची मतदार यादीत नोंदणी झाली आहे. मतदानाच्या वेळी अपंग व्यक्तींना मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याची व्यवस्था निवडणूक विभाग करणार आहे. ग्रामपंचायतने आपल्या निधीमधून व्हिलचेअर अपंग बांधवांसाठी खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलतांना रवींद्र जगताप म्हणाले, अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी अपंग व्यक्तींना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, त्यांची कामे वेळेत होतील यावर लक्ष द्यावे. निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास अपंग बांधव मतदान प्रक्रियेत सन्मानाने सहभागी होतील, असे ते म्हणाले.निवडणूक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पधेर्तील विजेत्यांना उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. वकृत्व स्पर्धा प्रथम प्रवीण शहारे, द्वितीय प्रवीण मांदाडे, तृतिय चंद्रकांत मारबते, निबंध स्पर्धा प्रथम सरिता राघोर्ते, द्वितीय शैजल ताले, तृतीय सुरज डोंगरे व चित्रकला स्पर्धेत प्रथम साजन गभणे, द्वितीय सरिता राघोर्ते आणि तृतीय सुदेश मांदाळे यांचा समावेश आहे.विविध उपक्रमआगामी लोकसभा निवडणूकीसाठी ३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे समाजातील प्रत्येक घटकांसाठी तसेच दिव्यांग, मुकबधीर, कर्ण बधीर मतदारांसाठी विशेष मोहीम राबवून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात आले. मुकबधीर, कर्णबधीर या नवीन मतदारांशी संवाद साधण्याकरीता सांकेतीक भाषाची कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत दिव्यंग बांधवांना विशेष प्रशिक्षण दिले होते.