शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणात जिल्ह्याची आघाडी, राज्यात तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आठ लाख ९८ हजार ४०० नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार ४४० असून, त्याची टक्केवरी ९५.८८ टक्के आहे, तर दुसरा डाेस सहा लाख ३३ हजार २८० व्यक्तींनी घेतला आहे. याची टक्केवारी ७०.४९ टक्के आहे. काेराेना विषाणूविरुध्द लढाईत लसीकरण महत्त्वाचा टप्पा आहे. काेराेनावर काेणतेही औषध नसून लस हाच एकमात्र उपाय आहे. त्यामुळे  नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी प्रभावीपणे माेहीम राबविण्यात येत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना विषाणूवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रभावीपणे माेहीम राबवित असून, लसीकरणात भंडारा जिल्ह्याने आघाडी घेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यात पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ९५ टक्के, तर दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. जिल्ह्यात आठ लाख ९८ हजार ४०० नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार ४४० असून, त्याची टक्केवरी ९५.८८ टक्के आहे, तर दुसरा डाेस सहा लाख ३३ हजार २८० व्यक्तींनी घेतला आहे. याची टक्केवारी ७०.४९ टक्के आहे. काेराेना विषाणूविरुध्द लढाईत लसीकरण महत्त्वाचा टप्पा आहे. काेराेनावर काेणतेही औषध नसून लस हाच एकमात्र उपाय आहे. त्यामुळे  नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी प्रभावीपणे माेहीम राबविण्यात येत आहे. १८ डिसेंबरपर्यंत जिल्ह्याने लसीकरणात निर्णायाक टप्पा गाठल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली. जिल्हा प्रशासन, आराेग्य यंत्रणेच्या समन्वयाने लक्ष साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने केलेले याेग्य व सुक्ष्म नियाेजनाचे हे फलित हाेय.

आस्थापनातील कर्मचाऱ्यांचा लसीकरणावर भर- जिल्ह्यातील सर्व उद्याेग, कंपन्या, कारखाने, औद्याेगिक व खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करुन घेत आहेत. प्रशासनाने याबाबत सर्व आस्थापनांना निर्देश दिले आहेत. यासाेबतच लसीकरण नाही तर वेतन नाही, असा इशारा जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिला. त्यामुळे कर्मचारीही आता लस घेण्यास पुढे येत आहेत.काेराेना कमी पण धाेका कायम- जिल्ह्यात काेराेनाचा संसर्ग कमी असला तरी धाेका मात्र टळलेला नाही. शनिवारी एका ८० वर्षीय वृध्दाचा काेरोनाने मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात तीन ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी काेराेना  नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस