शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्ज वाटपात जिल्हा सहकारी बँकेची आघाडी

By admin | Updated: July 17, 2016 00:20 IST

जिल्हास्तरीय समितीने सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात पिक कर्ज वाटपासाठी भंडारा जिल्हा सहकारी बँकेला २७० कोटी रूपयाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

९२ टक्के पीक कर्ज वाटप : राष्ट्रीयीकृत बँकांची माघारभंडारा : जिल्हास्तरीय समितीने सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात पिक कर्ज वाटपासाठी भंडारा जिल्हा सहकारी बँकेला २७० कोटी रूपयाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा बँकेने ५,१७२ सभासदांपैकी ३,७२८ सभासदांना १५३७.८० लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. १४ जुलैअखेर ५७,१०५ शेतकरी सभासदांना २५० कोटी ६२ लाख रूपयांचे पीक कर्जवाटप केले असून आतापर्यंत जिल्हा बँकेने ९२ टक्के पीक कर्जवाटप केले आहे.राष्ट्रीयकृत बँका मिळून केवळ २२५ कोटीचे उद्दिष्टे दिले. मात्र जिल्हा बँकेला २७० कोटीचे उद्दिष्टये देण्यात आले आहे. त्याहीस्थितीत शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँक आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांचीच बँक म्हणून ओळखली जाते. जिल्हा बँकही शेतकऱ्यांचे हित जोपासत आली आहे. जिल्ह्यातील शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी बँकेकडून वारंवार सुचनाही देण्यात येतात. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपल्या संस्थेतून तथा बँकेतून कर्ज उचल घेवून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केले आहे. एकीकडे जिल्हा बँक स्वनिधीतून कर्जपुरवठा करीत असते तर दुसरीकडे मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी हुंड्यापैकी काही रक्कम बँकेत जमा झाली नाही. हुुंड्यावरील व्याजाची रक्कम शासनाकडून बँकेला मिळाली नाही. ही योजना शासनाची असूनदेखिल शासन व्याजाचा पैसा पुरवू शकत नाही. जिल्हा बँकेकडून शासनाचे धोरण कटाक्षाने राबविले जातात. याउलट राष्ट्रीयकृत बँका शासनाच्या धोरणांना बगल देतात, तरीही प्रशासनाकडून जिल्हा बँकेला वेटीस धरण्याचा प्रयत्न करतात. या बँकेवर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज नसतानाही जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वनिधीतून कर्ज वाटप करत असते. पिक आणेवारी कमी आली तर शासन कर्ज वसूलीस स्थगिती देते. अशास्थितीत पिक कर्जाची वसुली पूर्णपणे होत नाही, त्यामुळे बँकेकडे पैसा येत नाही असे असताना ही जिल्हा प्रशासन दरवर्षी पिक कर्जाचा आकडा जिल्हा बँकेला वाढवून देण्यात येतो. इतर बँकांना मात्र पिक कर्जाचे उद्दिष्टे वाढवून दिले जात नाही. हा प्रकार असाच सुरू राहिला तर जिल्हा बँकेचे दिवाळे निघायला वेळ लागणार नाही. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी संचालकांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)