शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन लेफ्ट आउट’साठी जिल्हा प्रशासनाची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

बैठकीद्वारे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, महसूल यंत्रणा यांसह अन्य सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत झाल्या. शनिवारी जिल्ह्यात १९१ ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित केले.  भंडारा येथे १० ठिकाणी लसीकरण शिबिर पार पडले. अड्याळ, कोदुर्ली, चनेवाडा, विरली, पवनी येथे गृहभेटी देण्यात आल्या. मिशन लेफ्ट आउटचा एक भाग म्हणून रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर व ५० पेक्षा जास्त मजूर असलेल्या गावांमध्ये प्रशासन लसीकरणासाठी सरसावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लसीकरणामध्ये आघाडी घेत राज्यात जिल्हा पहिल्या तीन क्रमांकांमध्ये आहे. तरीदेखील शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी  प्रशासनाने ‘मिशन लेफ्ट आउट’अंतर्गत आगेकूच केली आहे. अगदी कॉल सेंटरपासून ते गावातील वाड्या-वस्त्यांपर्यंत दुर्गम भागातील घटकांपर्यंत प्रशासनासह आरोग्य यंत्रणा पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.    जिल्हा परिषद, पंचायत समिती  निवडणुकांचा पहिला टप्पा २१ तारखेला पार पडताच ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी उर्वरित नागरिकांच्या लसीकरणासाठी सूक्ष्म नियोजन केले. बैठकीद्वारे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, महसूल यंत्रणा यांसह अन्य सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत झाल्या. शनिवारी जिल्ह्यात १९१ ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित केले.  भंडारा येथे १० ठिकाणी लसीकरण शिबिर पार पडले. अड्याळ, कोदुर्ली, चनेवाडा, विरली, पवनी येथे गृहभेटी देण्यात आल्या. मिशन लेफ्ट आउटचा एक भाग म्हणून रोजगार हमी योजनेअंतर्गत कामावर व ५० पेक्षा जास्त मजूर असलेल्या गावांमध्ये प्रशासन लसीकरणासाठी सरसावले आहे.  लाखांदूर तालुक्यातील तीरखुरी, ओपारा, बोथली, पूयार; लाखनी तालुक्यातील वाकल, मोहाडी तालुक्यातील ताडगाव  मिंसी, निघवी, तुमसर तालुक्यातील पचारा, मांडवी गावात मजुरांसाठी शिबिर घेण्यात येणार आहे.  मोहाडी तालुक्यातील ८९ वर्षांच्या आजीबाईंना शनिवारी आरोग्य सेविकेने त्यांच्याकडे घरी जाऊन लस दिली. जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्यचिकित्सक रियाज फारुकी यांनी शनिवारी लाखनी तालुक्यातील नगरपंचायत लाखनी, मुरमाडी (सा), पिंपळगाव, पोहरा, शिवनी, पालांदूर येथे भेट देत  उर्वरित लसीकरण पूर्ण करून घेण्याबाबत निर्देश दिले. 

काय आहे मिशन लेफ्ट आउट?- लसीकरणांतर्गत  पहिल्या व दुसऱ्या डोसची शंभरच्या वर  लाभार्थी संख्या शिल्लक असलेल्या गावांमध्ये संबंधित तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, मंडल अधिकारी, आशा व अंगणवाडी सेविका, बचतगट यांच्या मदतीने नागरिकांचे मतपरिवर्तन करून लसीकरणाचे फायदे व समाजावर याबद्दल सकारात्मक व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. ‘मिशन लेफ्ट आउट’अंतर्गत तालुक्यातील गावांमधील पहिला व दुसरा डोस शिल्लक असलेल्या लाभार्थ्यांची यादी तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत कोविड लसीकरण ‘मिशन लेफ्ट आउट’  सुरू करण्यात आले आहे. गावातील १८ वर्षांवरील लाभार्थ्यांची यादी तयार करून  लसीकरणातून सुटलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करीत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या